Sunday, July 7, 2024

Latest Posts

Loksabha Election Result 2024 : एनडीए लागोपाठ तिसऱ्यांदा सरकार बनवणार , PM Modi

देशभरात लोकसभेच्या ५४३ जागांसाठी गेल्या महिन्याभरात ७ टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं. त्यामुळं सगळ्या देशाचं लक्ष हे आज जाहीर होणाऱ्या निवडणुकांच्या निकालाकडे लागले होते. देशात कुणाची सत्ता येणार? आणि कोणाला पराभवाची धूळ चाखावी लागणार याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती.

Loksabha Election Result 2024 :

देशभरात लोकसभेच्या ५४३ जागांसाठी गेल्या महिन्याभरात ७ टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं. त्यामुळं सगळ्या देशाचं लक्ष हे आज जाहीर होणाऱ्या निवडणुकांच्या निकालाकडे लागले होते. देशात कुणाची सत्ता येणार? आणि कोणाला पराभवाची धूळ चाखावी लागणार याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. तर अशातच वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांचा दणदणीत विजय हा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणासीतून जिंकले आहेत. त्यांनी वाराणासीत विजयाची हॅट्रीक केली आहे. मोदींनी काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा तब्बल दोन लाख मतांनी पराभव केला आहे. मोदी वाराणासीतून तिसऱ्यांदा विजयी झाले असले तरी मोदींचा करिष्मा मात्र संपुष्टात आल्याचं दिसून आलं आहे. गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत मोदींच्या मताधिक्यामध्ये यंदा मोठी घट झाली आहे. यावरून मोदी यांची लाट ओसरल्याचं स्पष्ट दिसून येतं.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. यावेळी बोलत असताना सर्वात आधी यांनी जय जगनाथ असं म्हणून आपल्या भाषणाला सुरुवात केली आहे. तुमचं हे प्रेम आणि स्नेह मला मिळाला यासाठी मी सर्वांचं ऋणी आहे असं मोठी म्हणले आहे. आणि आता पुन्हा तिसऱ्यांदा सरकार बनणार आहे. हा भारतीय राज्यघटनेवरील अतूट निष्ठेचा विजय आहे. हा १४० कोटी भारतीयांचा विजय आहे. मी निवडणूक आयोगाचेही अभिनंदन करेन. निवडणूक आयोगाने जगातील सर्वात मोठी निवडणूक इतक्या सक्षमपणे पार पाडली. देशवासीयांनी भाजपवर आणि एनडीएवर पूर्ण विश्वास हा दाखवला आहे. आजचा हा विजय विश्वातील सर्वात मोठी लोकतंत्रेचा विजय आहे. जम्मू-काश्मीरच्या मतदारांनी या निवडणुकीत विक्रमी मतदान करून अभूतपूर्व उत्साह दाखवला आणि जगभरात भारताची बदनामी करणाऱ्या शक्तींना आरसा दाखवला, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात आई हिराबेनचा उल्लेख केला. त्यांचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी भावूक झाले. ते म्हणाले की, माझ्या आईशिवाय ही माझी पहिलीच निवडणूक आहे, पण या देशातील प्रत्येक महिला आणि मुलीने मला ते नुकसान होऊ दिले नाही.

हे ही वाचा:

Exit Poll Election 2024 : ‘एक्झिट पोल’ काय असतं ? आणि ते कसे केले जातात ?

सावधान! AC ची हवा खाताय; ‘या’ आजारांपासून दूर राहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss