सरकारने केला मोठा बदल ! केवळ आधार कार्डद्वारे तपासली जाणार नाही PM किसान योजनेचे स्टेटस

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा लाभ मोठ्या संख्येने शेतकरी घेत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यावेळी १२ व्या हप्त्याचे पैसे एकूण ८ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी, १७ ऑक्टोबर २०२२ रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सांगितले.

सरकारने केला मोठा बदल ! केवळ आधार कार्डद्वारे तपासली जाणार नाही PM किसान योजनेचे स्टेटस

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा लाभ मोठ्या संख्येने शेतकरी घेत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यावेळी १२ व्या हप्त्याचे पैसे एकूण ८ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी, १७ ऑक्टोबर २०२२ रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सांगितले. अशा परिस्थितीत १२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पोहोचला.

अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या बँक खात्यात १२ वा हप्ता अद्याप पोहोचलेला नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात, यावर शेतकरी या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे स्टेटस जाणून घेऊ शकतात. पण आता स्टेटस पाहण्याच्या पद्धतीत काही बदल झाला आहे.

सरकारने काही दिवसांपूर्वी पीएम किसान योजनेमध्ये केवायसी अनिवार्य करणे, जमिनीच्या नोंदींची पडताळणी तसेच लाभार्थी पोर्टलवर स्थिती तपासण्याची प्रक्रिया यामध्ये मोठे बदल केले आहेत. आता पीएम किसान योजनेशी जोडले राहण्यासाठी शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक महत्त्वाची भूमिका बजावेल. त्याचवेळी, आतापासून लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलला भेट देताना आधार क्रमांक दाखवावा लागणार नाही, आधार, पॅन आणि बँक लिंक केलेल्या रजिस्टर मोबाइल क्रमांकावरच त्यांचे स्टेटस जाणून घेऊ शकतील.

पीएम किसान सन्मान निधी योजनेतील स्थिती पाहता सरकारने मोठा बदल केला आहे. यामध्ये आता लाभार्थी पोर्टलवर जाऊन केवळ आधार क्रमांकावरून त्यांचे स्टेटस पाहू शकणार नाही. तर यासाठी आता रजिस्टर मोबाईल क्रमांकही अनिवार्य करण्यात आला आहे. यापूर्वी शेतकरी आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकून त्यांचे स्टेटस तपासू शकत होते. मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे.

स्टेटस पाहण्यासाठी नवीन प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या –

१ स्टेप
तुम्हालाही तुमचे स्टेटस नवीन पद्धतीने तपासायचा असेल, तर सर्वप्रथम pmkisan.gov.in या PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

२ स्टेप
त्यानंतर तुम्हाला लाभार्थी स्टेटस वर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर दिसणार्‍या नवीन पेजवर तुमचा नोंदणी क्रमांक टाकून तुमचे स्टेटस तपासू शकता. जर तुम्हाला हे माहित नसेल, तर ‘Know Your Registration Number’ या लिंकवर क्लिक करा.

३ स्टेप
त्यानंतर रजिस्टर मोबाइल क्रमांक टाका आणि कॅप्चा कोड भरा आणि Get Mobile OTP वर क्लिक करा. आता मोबाईलवर मिळालेला OTP टाका आणि Get Details वर क्लिक करा. त्यानंतर माहिती तुमच्या समोर येईल.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंचे राईट हँड नार्वेकरांची भाजपश्रेष्ठींशी जवळीक

पंतप्रधान मोदी आज घेणार रोजगार मेळा, ७५,००० लोकांना मिळणार नियुक्ती पत्र

Dhantrayodashi 2022 : आज दिवाळीचा दुसरा दिवस ‘धनत्रयोदशी’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version