शरयू नदीच्या किनाऱ्यावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती संपन्न

आज दिवसभर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra Chief Minister Eknath Shinde) यांचा अयोध्या दौरा चांगलंच चर्चेत आहे.

शरयू नदीच्या किनाऱ्यावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती संपन्न

आज दिवसभर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra Chief Minister Eknath Shinde) यांचा अयोध्या दौरा चांगलंच चर्चेत आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सगळ्या आमदार आणि खासदारांसह अयोध्येत पोहचले आहेत. सकाळी श्री राम मंदिराकडे जात असताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत हे करण्यात आले आहे. त्याच सोबत आता संध्याकाळी एकनाथ शिंदे यांचे शरयू नदीच्या किनाऱ्यावर देखील जोरदार स्वागत हे करण्यात आले आहे. तसेच संपिरन परिसरात विद्युत रोषणाई ही करण्यात आली आहे.

शरयू नदीच्या काठी एकनाथ शिंदे यांचे जोरदार स्वागत हे करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे शरयू नदीकिनारी आगमन होतात फटाक्यांची जोरदार आदेशबाजी ही करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीनं मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंबोबस्त तैनात करण्यात आला आहे. नदीकिनारी हजारो शिवसैनिकांची गर्दी जमली होती. तसेच एकनाथ शिंदे शरयू नदीच्या किनाऱ्यावर आरती करत असताना ठाण्यात देखील महा आरती देखील पार पडली आहे.

काल दि. ८ अपील रोजी एकनाथ शिंदे हे लखनऊला पोहचले तर आता त्यांच्या पाठोपाठ आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील लखनऊ मध्ये पोहचले. यावेळी सकाळी अयोध्येत त्यांची रॅली देखील झाली. दरम्यान, रॅलीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामलल्लाची महाआरती करण्यात आली. महाआरतीवेळी शिवसेनेचे सर्व खासदार, आमदार आणि मंत्री हजर होते. शंखनादात राम मंदिरात आरती करण्यात आली. तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांनी २ तोळ्याचा धनुष्यबाण हा मंदिराला भेट दिला आहे.

तसेच अयोध्येतून मोठं शक्तीप्रदर्शन हे करण्यात आलं आहे. तसेच मोठी बाईक रॅली काढण्यात आली होती. जारो शिवसैनिक या रॅलीत सहभागी झाले होते. काही शिवसैनिक पायी चालत होते तर काही बाईकवरून येत होते. त्यानंतर हा ताफा पंचशील हॉटेलवरून अयोध्येत राममंदिर परिसरात आला तेव्हा त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. तसेच कपाळावर टिळा आणि गळ्यात भगवा शेला घालून दोन्ही नेते जीपवरून हात उंचावून दाखवत होते. शिवसैनिकांच्या हातात भगवे झेंडे होते. जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात होत्या. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवमय झालं होतं. तसेच अयोध्येत नाक्या नाक्यावर भगवे झेंडे लावण्यात आले होते. पोस्टर्स आणि बॅनरबाजी करण्यात आली होती.

Exit mobile version