spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मिंधे सरकारला भानावर आण्यासाठी माविआचा महामोर्चा, मोर्च्यापूर्वी व्हिडिओ मार्फत शक्तिप्रदर्शन

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) येत्या १७ डिसेंब र२०२२ रोजी राज्य सरकारविरोधात (Maharashtra government) रस्त्यावर उतरून महामोर्चा काढणार आहे. याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख (shivsena)आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी केली आहे. राज्य सरकारकडून आणि राज्यपालांकडून महाराष्ट्राचा वारंवार अपमान केला जात आहे असा आरोप विरोधक करत आहेत. या विरोधातच उद्धव ठाकरेंनी आंदोलनाची हाक दिली. राज्यपालांना हटवले जावे, भाजपच्या नेत्यांकडून वारंवार महापुरुषांचा केला जाणारा अपमान याविरोधात हा मोर्चा असणार आहे अशी माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. या संधर्भात काल अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी अजित पवार यांनी महामोर्चाबद्दल भूमिका मांडली. येत्या १७ डिसेंबरला मुंबईत मोर्चा काढण्यावर महाविकास आघाडी ठाम आहे.

हेही वाचा : 

Maharashtra news राज्यात पुणे, वरळीनंतर आज ‘या’ शहरात बंदची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

महाविकास आघाडीची या मोर्चासाठी पूर्ण तयारी झालीय. विशेष म्हणजे या मोर्चासाठी आता महाविकास आघाडीकडून वातावरण निर्मिती केली जातेय. त्यासाठी महाविकास आघाडीने मोर्चा कशासाठी या मथळ्याखाली अनेक उत्तर स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलायय. महाविकास आघाडीकडून सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.

Avatar चित्रपट ‘दृश्यम 2’ची डिमांड करणार कमी?, केवळ ॲडव्हान्स बुकिंगच्या कलेक्शनमध्ये २० कोटींचा पल्ला पार

अजित पवार यांनी म्हटले, या मोर्चात मुंबईत मोठ्या प्रमाणात नागरीक सहभागी होतील. महागाई हा देखील या मोर्चातील प्रमुख मुद्दा आहे. सर्व विरोधी पक्षांना अतिशय समजंस भूमिका घेतली आहे. सर्व विरोधी पक्ष या मोर्चासाठी एकत्र आले आहेत. अतिशय शांततेच्या मार्गाने, मोर्चा विध्वंसक होणार नाही, शांततेने आम्ही मोर्चा काढणार आहोत. आम्ही या मोर्चासाठी परवानगी मागितली आहे. अजून परवानगी मिळालेली नाही. पण आम्हाला परवानगी मिळेल, असा मला विश्वास आहे.

Corona virus चीनमधील वाढत्या कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येचं संपूर्ण जगापुढे टेन्शन

Latest Posts

Don't Miss