spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maharashtra Assembly Budget Session, आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; सत्ताधारी-विरोधक आमने सामने

महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आज दि. २७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राज्याचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे.

Maharashtra Assembly Budget Session : महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आज दि. २७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राज्याचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे अधिवेशन चांगलेच वादळी ठरणार असल्याचे चर्चा आहे. शिंदे-ठाकरे गटात सुरू असलेला संघर्ष आणि राज्यातील राजकीय संघर्षाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्ष, शेतकऱ्यांचा मुद्दा, पोटनिवडणूक प्रचारातील गैरप्रकार यासह अनेक मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधक आमने-समाने येण्याची शक्यता आहे.

विरोधकांनी काल सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे आजपासून सुरू होणारे अधिवेशन अधिकच गाजणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. शिंदे गटाला निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत असून ठाकरे गट शिंदे सरकारची कशाप्रकारे अधिवेशनात कोंडी करतं याकडे पाहावं लागणार आहे.

तसेच आज वित्त आणि नियोजन मंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी सादर होणार आहे. आगामी महापलिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, नागपूर या शहरांसाठी अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात.

काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आणि शिवसेना हे नाव अंडी धनुष्यबाण हे चिन्ह त्यांनी शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे ठाकरे गट हा चांगलाच आक्रमक झाला आहे. याचे पडसाद देखील आज उमटण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना घातल्या तीन अटी

दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा, शिवसैनिकांचा पैसा त्यांना मिळाला पाहिजे…

देवेंद्र फडणवीस यांना काळीज नसेल .. टीका करत सुषमा अंधारे म्हणाल्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss