MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : ‘बजेट म्हणजे लबाडांच्या घरचं आवतान’ Ajit Pawar यांचा विरोधकांना टोला ; जयंत पाटील यांचे यावर प्रतिउत्तर

अर्थसंकल्पाबद्दल खूप चर्चा घडल्या. ज्याने अजित पवार यांच्या वर अनेक आरोप करण्यात आले. हे सर्व पाहता त्यांनी आज म्हणजे ४ जुलै रोजी एक ट्विट केले आहे. जे ट्विट आता फारच मोठ्याप्रमाणावर चर्चेचा विषय बनले आहेत.एकंदरीत त्यांनी घातलेली ही  भकवनिकसाद विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने लोकांच्या मनात काही नवे स्थान निर्माण करू पाहत आहेत का हाही एक मुद्दा समोर येऊ शकतो. 

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : ‘बजेट म्हणजे लबाडांच्या घरचं आवतान’ Ajit Pawar यांचा विरोधकांना टोला ; जयंत पाटील यांचे यावर प्रतिउत्तर

पावसाळी अधिवेशन (MONSOON SESSION) गुरुवारपासून सुरु झाले आहे. या पावसाळी अधिवेशनात सरकारने २०२४-२५ अर्थसंकल्प सादर केला. सदर अर्थसंकल्पात अनेक योजनाची घोषणा करण्यात आली होती. राज्याचा अर्थसंकल्प (budget) जाहीर करण्यात आला. हा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी २८ जून रोजी सादर केला होता. त्याच अर्थसंकल्पाबद्दल खूप चर्चा घडल्या. ज्याने अजित पवार यांच्या वर अनेक आरोप करण्यात आले. हे सर्व पाहता त्यांनी आज म्हणजे ४ जुलै रोजी एक ट्विट केले आहे. जे ट्विट आता फारच मोठ्याप्रमाणावर चर्चेचा विषय बनले आहेत.एकंदरीत त्यांनी घातलेली ही  भकवनिकसाद विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने लोकांच्या मनात काही नवे स्थान निर्माण करू पाहत आहेत का हाही एक मुद्दा समोर येऊ शकतो. 

“राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही. पहिल्या दिवसापासून राज्यातील जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. मी पूर्वीही जनतेचाच होतो आणि आजही जनतेचाच आहे,” असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केले. अजित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटरद्वारे एक व्हीडीओ ट्विट केला आहे. या व्हीडीओत अजित पवार हे राज्यातील जनतेला भावनिक साद घालताना दिसत आहेत. तसेच, या व्हीडीओद्वारे राज्यातील अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांनाही टोला लगावला आहे. त्यांनी या त्यांच्या व्हिडियोमध्ये एकंदरीत अर्थसंकल्पातील संपूर्ण योजनांचा आढावा घेतला आहे. प्रत्येक योजनेविषयी त्यांनी या व्हिडिओत इत्यंभूत माहिती दिली आहे. सोबतच विरोधोकांना त्यांनी अनेक टोळेसुद्धा लगावले आहेत. 

नक्की काय म्हणाले अजित पवार ?

“नकारात्मक, निगेटिव्ह लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करतात, त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जातंय. काहींकडून या बजेटला ‘लबाडाच्या घरचं आवतान’ आणि अजूनही बरीच नावं ठेऊन हिणवलं जातंय. मला फक्त इतकंच सांगायचंय की या लोकांमध्ये आणि तुमच्या अजित दादामध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणारे आणि तुमचा दादा काम करणारा आहे. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही, पार्टी बदललेली नाही. अगदी पहिल्या दिवसापासून राज्यातील जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. मी पूर्वीही जनतेचाच होतो आणि आजही जनतेचाच आहे. मी जे काही करतो, त्यामध्ये जनतेच्या हिताचाच विचार करतो. राज्याच्या राज्यातील जनतेच्या विकासाच्या चाकाला अधिक गती कशी देता येईल, याचाच विचार माझ्या डोक्यात कायम सुरु असतो. राज्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट समोर ठेऊन त्याच विचारातून हा अर्थसंकल्प बनवण्यात आला आहे.”

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात काही नव्या योजना आणल्या आहेत, या योजनांवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत अजित पवार हे राज्यातील जनतेला भावनिक साद घालताना दिसत आहेत. तसेच, या व्हिडिओद्वारे राज्यातील अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांनाही टोला लगावला आहे. यावरुन आता ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी अजित पवार यांना डिवचलं आहे. त्यावरून जयंत पाटील यांनी त्यांनां प्रतिउत्तर दिले. 

जयंत पाटील (Jayant Patil) यावर काय म्हणाले ?

“आम्ही अनेक वर्षे सोबत काम केले आहे, आम्ही कधी एखादी गोष्टी स्वतः केली असं सांगितलं नाही. त्यामुळे त्यांचा तो स्वभाव आहे, त्यामुळे त्यांनी व्हिडिओमध्ये तशी भूमिका घेतली. मेजॉरीटी आल्यानंतर मुख्यमंत्री होणार, आता महाराष्ट्रातील लोकांचा कल समोर आला आहे. लोकसभेचा कल समोर आला. लोक महाराष्ट्रातील सरकारच्या विरोधातही आहेत. लोक जेवढी एनडीए सरकारविरोधात आहेत त्यापेक्षा जास्त महाराष्ट्र सरकारविरोधात आहेत. त्यामुळे त्यांचे अंतर्गत सर्व्ह ५०, ६० जागांच्या पुढे दाखवत नसतील म्हणून अतिशय टोकाच्या या योजना करण्याचा प्रयत्न केला आहे”, असा टोलाही पाटील यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला लगावला.

 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version