Thursday, July 4, 2024

Latest Posts

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : शिंदे सरकारने केली नवी योजना जाहीर

"याबाबात नियम ठरवू, दरवर्षी एक नवीन नियमावली करुन आपण किती लोकांना पाठवू शकतो हे ठरवता येईल...

पावसाळी अधिवेशन (MONSOON SESSION) गुरुवारपासून सुरु झाले आहे. या पावसाळी अधिवेशनात सरकारने २०२४-२५ अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अनेक योजनाची घोषणा करण्यात आली. आज विधिमंडळ तिसरा दिवस आहे. त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प (budget) जाहीर करण्यात आला. हा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केला. विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने या अर्थसंकल्पात अनेक घोषणा देण्यात आल्या.

विरोधकांनी अर्थासंकल्पावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. तर सत्ताधाऱ्यांकडूनही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन (Monsoon Session of Legislature) सुरु आहे. यामध्ये काल अर्थसंकल्प (Budget) जाहीर करण्यात आला व त्यात महिला, शेतकरी, तरुण वर्ग अशा सर्वांसाठीच राज्य सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. त्यातच आणखी एक मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत केली. राज्यात ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ (Chief Minister Pilgrimage Scheme) राज्य सरकारने सुरु करणार असल्याचा निर्णय घेतला आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं.

यासंदर्भात प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. याला प्रतिउत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “पांडुरंगाची वारी सुरु आहे. आपण २० हजार रुपये दिंडीला अनुदान देण्याचा निर्णय हा आधीच घेतला गेला आहे.” यासोबत  मुख्यमंत्री यांनी या संदर्भात अनेक महत्वपूर्ण नियमावली व उपाययोजना जाहीर केल्या आहेत.  

‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ या योजनेबाबत  नियमावली तसेच उपयोजन करण्यात येणार आहे. “याबाबात नियम ठरवू, दरवर्षी एक नवीन नियमावली करुन आपण किती लोकांना पाठवू शकतो हे ठरवता येईल. बाय रोटेशनप्रमाणे ही योजना सुलभपणे राबवू” असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्वधर्मीयांसाठी ही योजना सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

काही जणांची इच्छा असते पण ते लोक जाऊ शकत नाहीत. अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना लागू करु. या योजनेचा आशीर्वाद सरकारला मिळेल. आम्ही नवीन नवीन निर्णय घेऊ,” असे मुख्यमंत्री म्हणाले. “लाडकी बहिण योजना आपण सुरु केली आहे. तर काही लोक म्हणाले की आरे लाडका भाऊ कुठे गेला. तर आम्ही लाडक्या भावाचा देखील निर्णय घेतला आहे,” असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

अशा प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक नव्या योजनांवर काम करण्याचे आश्वासन केले आहे. 

हे ही वाचा:

“तिजोरीत खळखळाट, अन् थापांचा सुळसुळाट” असे म्हणत पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस दणाणून सोडला

MPCB ने केली वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; आता इंद्रायणी प्रदूषण मुक्त होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss