Saturday, July 6, 2024

Latest Posts

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : दुर्बल घटकांसाठी अर्थ संकल्पात आणल्या नवीन योजना

साधारणतः महिला, शेतकरी, नोकरदार वर्ग व दुर्बल घटका इत्यादींसारख्या काही मुख्य वर्गांना लक्ष करण्यात आले. सोबतच यात अनेक नवनवीन योजना सांगण्यात आल्या आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.

पावसाळी अधिवेशन (MONSOON SESSION) गुरुवारपासून सुरु झाले आहे. या पावसाळी अधिवेशनात सरकारने २०२४-२५ अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अनेक योजनाची घोषणा करण्यात आली. आज विधिमंडळ दुसरा दिवस आहे. त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प (budget) जाहीर करण्यात आला. हा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केला.

साधारणतः महिला, शेतकरी, नोकरदार वर्ग व दुर्बल घटका इत्यादींसारख्या काही मुख्य वर्गांना लक्ष करण्यात आले. सोबतच यात अनेक नवनवीन योजना सांगण्यात आल्या आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. हे शिनेसरकारचे (shivasena) शेवटचे बजेट आहे. यात ७६००० कोटी रुपयांचा वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या पावसाळी अधिवेशनात हा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै २०२४ रोजी सुरु करणार आहे. राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. या अर्थसंकल्पात दुर्बल घटकांसाठीसुद्धा काही नवीन संकल्पना ताथा योजना सरकार घेऊन आले आहेत.

दुर्बल घटकांनसाठीच्या काही महत्वपूर्ण योजना पुढील प्रमाणे आहेत.

जाणूयात सविस्तर  –

  1. ‘सर्व स्वरुपातील सार्वत्रिक दारिद्रय नाहीसे करणे’ हे शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याचा निश्चय आहे.
  2. ‘संजय गांधी निराधार अनुदान योजना’ आणि ‘श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून‘ निराधार, विधवा, दिव्यांग तसेच वृध्द नागरिकांच्या दरमहा अर्थसहाय्यात वाढ केली जाणार.
  3. एक हजारावरुन दीड हजार रुपये अशी वाढ ही सन २०२३-२४ मध्ये ४५ लाख ६० हजार लाभार्थींना ७ हजार १४५ कोटी रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आली.
  4. पान, पानपिंपरी आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल.
  5. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तसेच कार्यरत महामंडळांसाठी निधीची पुरेशी तरतूद केली जाईल.
  6. दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना’ – पहिल्या टप्प्यात ३४ हजार ४०० घरकुल बांधण्यात येणार आहेत.
  7. दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रीक वाहनाचे वाटप करणार आहेत.
  8. तृतीयपंथी धोरण-२०२४ जाहीर-भरती प्रक्रियेमध्ये तसेच सर्व शासकीय योजनांमध्ये स्त्री-पुरुषांसोबतच ‘तृतीयपंथी’ हा लिंग पर्याय उपलब्ध-तृतीयपंथीयांना राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहेत.
  9. धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांसाठी खारघर, नवी मुंबई येथे ४ हजार चौरस मीटरचा भूखंड दिन्यात येईल.
  10. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळामार्फत नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येणार आहेत.
  11. ‘मौलाना आझाद अल्पसंख्याक’ आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांकरीता कर्जावरील शासन हमीची मर्यादा ३० कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपये देण्यात येतील.
  12. ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ राज्यातील सर्व कुटुंबांना लागू करणार आहेत.
  13. आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब १ लाख ५० हजार रुपयांवरून ५ लाख रुपये – एक हजार ९०० रुग्णालयांमार्फत एक हजार ३५६ प्रकारचे उपचार उपलब्ध होणार आहेत.
  14. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ३४७ ठिकाणी कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
  15. पतसंस्थांच्या स्थिरीकरण व तरलतेसाठी १०० कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे.
  16. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी, पारधी व आदिम आवास योजना, मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण योजना या नव्यावणे कार्यान्वित करण्यात येतील.
  17. मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनांच्या माध्यमातून पुढील ५ वर्षात ३५ लाख ४० हजार ४९१ घरकुल बांधण्यात येणार आहेत.
  18. सन २०२४-२५ मध्ये विविध घरकुल योजनांकरीता ७ हजार ४२५ कोटी रुपयांची तरतूद कलेची आहे.
  19. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गिरणी कामगारांना १२ हजार ९५४ सदनिका वितरित-उर्वरित सदनिका उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात येणार आहेत.
  20. सन २०२४-२५ साठी स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १ हजार ८८६ कोटी ८४ लाख निधीची तरतूद करण्यात येणार आहेत.

अशाप्रकारे दुर्बल घटकांसाठी अनेक योजना राबवण्याचा निश्चय शिंदे सरकारने (Shinde Sarkar)  आपल्या अर्थसंकल्पात मांडण्यात आल्या आहेत. याचा फायदा हा दुर्बल घटकांसाठी मोठ्याप्रमाणावर होणार आहे. त्यामुळे या वेळच्या अर्थ संकल्पात दुर्बल घटकांच्या दृष्टीने महत्वाचा आहे.

हे ही वाचा

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : PUNE HIT-AND-RUN या प्रकरणी विधानसभेत फडणवीसांचे भाष्य..

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : “अर्थ संकल्पातून महिलांचं सरकार असल्याची प्रचिती येते” शिवसेना प्रवक्त्या सुशीबेन शहा यांचे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss