Monday, July 8, 2024

Latest Posts

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : “मागच्या १० वर्षतील सर्वोत्कृष्ट हा अर्थ संकल्प आहे..” ; अजितदादांनी मांडली विधानसभेत भूमिका

अशी शेरो शायरी करून अजित पवार यांनी विरोधकांनवर टोला लगावला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणाबाजी केल्याचे म्हणत विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली होती. तसेच, अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप केला होता.

पावसाळी अधिवेशन (MONSOON SESSION) गुरुवारपासून सुरु झाले आहे. या पावसाळी अधिवेशनात सरकारने २०२४-२५ अर्थसंकल्प सादर केला. सदर अर्थसंकल्पात अनेक योजनाची घोषणा करण्यात आली होती. राज्याचा अर्थसंकल्प (budget) जाहीर करण्यात आला. हा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी २८ जून रोजी सादर केला होता. त्याच अर्थसंकल्पाबद्दल खूप चर्चा घडल्या. ज्याने अजित पवार यांच्या वर अनेक आरोप करण्यात आले. हे सर्व पाहता त्यांनी आज म्हणजे ४ जुलै रोजी एक ट्विट केले आहे. जे ट्विट मोठ्याप्रमाणावर चर्चेचा विषय बनला होता. त्यानी या जनतेला अर्थसंकल्पबद्धल एक भावनिक साद घातली होती. ज्यावरून ते चर्चेत आले होते. एकंदरीत त्यांनी घातलेली ही  भकवनिकसाद विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने लोकांच्या मनात काही नवे स्थान निर्माण करू पाहत आहेत का हाही एक मुद्दा समोर येऊ शकतो.

प्यार करोगे तो प्यार करेंगे .. हात मिलाओगे तो हाथ मिलायेंगे 
गले मिलाओ गे तो गले मिलायेंगे सीतम करोगे तो सीतम  करेंगे ,
हम  आदमी है तुम्हारे जैसेजो तुम करोगे वो हम करेंगे 

अशी शेरो शायरी करून अजित पवार यांनी विरोधकांनवर टोला लगावला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणाबाजी केल्याचे म्हणत विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली होती. तसेच, अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप केला होता. आज विधानसभेत अजित पवार यांनी या अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले. अजित पवार यांनी १० वर्षांच्या अनुभवातील हा सर्वोत्तम अर्थसंकल्प असल्याचे सांगितले तसेच, शेरोशायरीतून अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला “मी अर्थसंकल्प मांडला, त्यावर काहींनी टीका केली. विरोधकांचे विरोध करणं काम आहे. त्यांनी चांगल्या गोष्टीही सांगितल्या अर्थसंकल्प फुटल्याचे वक्तव्य काही सदस्यांनी केले. विजय वडेट्टीवार जयंत पाटील हे सिनियर असताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मात्र अर्थसंकल्प कुठेही फुटलेला नाही त्याची गोपनियता राखलेली आहे”, असे अजित पवार यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्री अजित पवार नक्की म्हणाले ?

“मी अर्थसंकल्प मांडला, त्यावर काहींनी टीका केली. जवळ जवळ ७० जणांनी या अर्थ संकल्पाच्या चर्चेत सहभाग नोंदवला आहे. ही अशी परिस्थिती मागच्या ११ वर्षांनमध्ये घडली नाही. ती आता घडली.  विरोधकांचे विरोध करणं काम आहे. त्यांनी चांगल्या गोष्टीही सांगितल्या अर्थसंकल्प फुटल्याचे वक्तव्य काही सदस्यांनी केले. विजय वडेट्टीवार जयंत पाटील हे सिनियर असताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मात्र अर्थसंकल्प कुठेही फुटलेला नाही त्याची गोपनियता राखलेली आहे या अर्थसंकल्पात सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत काहींनी प्रश्न उपस्थित केले, जयंतरावांनी ९ वेळा अर्थसंकल्प मांडला. मी १० वेळा बजेट मांडले आहे, त्यामुळे थोडा बहुत अनुभव आहे. महाविकास आघाडी असो महायुती असो दोन्ही बाजूनी मीच अर्थसकल्प मांडला पण इकडनं मांडला की तिकडचे टीका करतात, तिकडनं मांडला की इकडचे टीका करायचे. कोरोना काळात महसुल कमी जमा झाला आता मागील वर्षाच्या तुलनेन ११ टक्के महसुल वाढ झाली आहे. साधारण २५-३० हजार कोटी महसुलात वाढ होताना दिसत आहे. जीएसटी व्हॅट तसंच इतर करांमुळे ही वाढ होत आहे. कर माध्यमातून उत्त्पन वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे,”असे अजित पवार यांनी सांगितले,

एकदंरीतच अजित पवार यांनी अर्थसंकल्प आणि या अर्थसंकल्पावर आक्षेप घेणाऱ्या विरोधी पक्षाला तोडीसतोड असे उत्तर दिले आहे.

हे ही वाचा:

ICC T20 WORLD CUP 2024 : विजयी मुलाला भेटण्याची आईची आतुरता पोहोचली शिगेला ; डॉक्टरांची अपॉइमेन्ट केली कॅन्सल.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss