MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिल्या नव्या सूचना ..

योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिल्या नव्या सूचना ..
पावसाळी अधिवेशन (MONSOON SESSION) गुरुवारपासून सुरु झाले आहे. या पावसाळी अधिवेशनात सरकारने २०२४-२५ अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अनेक योजनाची घोषणा करण्यात आली. आज विधिमंडळ सहावा दिवस आहे. त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प (budget) जाहीर करण्यात आला. हा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी २८ जून रोजी सादर केला होता.
 
साधारणतः महिला, शेतकरी व नोकरदार वर्ग अश्या काही वर्गांवर लक्ष करण्यात आले. सोबतच यात अनेक नवनवीन योजना सांगण्यात आल्या आहेत.ज्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. हे शिनेसरकारचे (shivasena) शेवटचे बजेट आहे. यात ७६००० कोटी रुपयांचा वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या पावसाळी अधिवेशनात हा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला होता. यात मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण योजना’ जुलै २०२४ रोजी सुरु करण्यात आली आहे. आता याच योजनेत काही नवे बदल करण्यात आले आहेत.
 
यात महिलांचे वय आता ६५ वर्ष इतके वाढवण्यात आले आहे. तसेच या योजनेच्या अर्ज भरण्याची तारीखसुद्धा वाढवण्यात आली आहे. परंतु हे अर्ज ऑफलाईन मिळत आहेत. हे अर्ज भरून घेण्यासाठी तहसील कार्यालयात शुल्क आकारण्यात आले आहेत. या प्रकरणावर आज म्हणजे ३ जुलै रोजी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde)यांनी उत्तर दिले आहे. 
 
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्सनास आल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, या योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.
 
“त्याचबरोबर योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करुन देणे किंवा फॉर्म भरुन देण्याचे निमित्त करुन निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
 
योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन देणे तसेच त्यानंतर योजनेचा फॉर्म भरणे इत्यादी संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात काल विधानभवन येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलदगतीने होईल यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. 
 
माता-भगिनींचे आयुष्य बदलवून टाकणाऱ्या विविध योजना राज्य शासनाने आणल्या आहेत. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयही लगेचच काढण्यात आला. या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. यासाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही योजना म्हणजे माता-भगिनींना माहेरचा आहेर आहे. नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही, यादृष्टीने चोख नियोजन करावे, लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सोबतच या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या नियमही शिथिल करण्यात आले आहेत.  
 

हे ही वाचा:

VIDHAN PARISHAD ELECTION : ज्येष्ठ नेत्यांनी PANKAJA MUNDE यांना दिला बुस्टर डोस ; अर्ज भारण्यापूर्वी माध्यमांशी साधला भावुक संवाद

THE ACADEMY SCHOOL, PUNE (TAS) यांनी केली जागतिक आयआयएमयुएन परिषद आयोजित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version