Friday, July 5, 2024

Latest Posts

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : Vijay Wadettiwar यांनी सरकारवर केली खरमरीत टीका

लाडकी बहिण योजना जरी काढली असेल तरी या सरकारला बहिणी मतदान देणार नाही. शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. आमच्या बहिणी यांना भीक घालणार नाहीत, अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी लाडकी बहिण योजनेवर (Ladki Bahin Yojana) शिंदे सरकारवर (Shinde Government) केली.

पावसाळी अधिवेशन (MONSOON SESSION) गुरुवारपासून सुरु झाले आहे. या पावसाळी अधिवेशनात सरकारने २०२४-२५ अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अनेक योजनाची घोषणा करण्यात आली. आज विधिमंडळ अठवा दिवस आहे. त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प (budget) जाहीर करण्यात आला होता. हा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केला. विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने या अर्थसंकल्पात अनेक घोषणा देण्यात आल्या.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. या अर्थसंकल्पात ‘लाडकी बहीण योजना’ (Ladki Behna Yojana), मुलींचं मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेची घोषणा केली. १ जुलैपासून या योजनेची अंमलबजावी सुरु करण्यात आली. या सर्व सरकारच्या योजनांवर विधान परिषद असो वा विधानभवन असो यावर अनेकांनी मोठी चर्चा घडून आणली. याच योजनांवर आज म्हणजेच ५ जुलै रोजी विजय वड्डेतीवार यांनी मोठ्ये भाष्य केले आहे.

विजय वड्डेतीवार नक्की काय म्हणाले ?

“लाडकी बहिण योजना जरी काढली असेल तरी या सरकारला बहिणी मतदान देणार नाही. शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. आमच्या बहिणी यांना भीक घालणार नाहीत, अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी लाडकी बहिण योजनेवर (Ladki Bahin Yojana) शिंदे सरकारवर (Shinde Government) केली. विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अजित पवार यांनी म्हटले की, आम्ही उमेदवार मागे घेणार नाही.
महाविकास आघाडीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करेल का? असे विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, आमचे तीनही उमेदवार निवडून येतील ही खात्री आहे. तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच नाही. मराठवाड्यातून शेतकऱ्यांच्या ३५० डीपी चोरीला गेल्या आहेत. त्यावर सरकारचचं लक्ष नाही. शेतकऱ्यांचे ४६०० कोटी रुपये सरकारने दिलेले नाहीत.
आपत्तीग्रस्तांच्या नावाला १५ हजार कोटी सांगत शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. सरकार शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी करत आहे. बीडमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसीच्या नावाने लाटल्या. सरकार केवळ आम्ही खोटे नेरेटिव्ह सेट केले बोलतात. आम्ही काय खोटे नेरेटिव्ह सेट केले, तुम्हीच खोटं बोललात, अशी टीका त्यांनी” यावेळी सरकार केली आहे.

या साकारचा शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले जाणूयात ते नक्की काय म्हणाले ?

“लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवार म्हणाले की, लाडकी बहिण योजना जरी काढली असेल तरी या सरकारला बहिणी मतदान देणार नाही. लाडकी बहिण योजना म्हणजे सरकारी खात्यातून मत विकत घेणं आहे. आमच्या बहिणी यांना भीक घालणार नाही. शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. ही सद्बुद्धी त्यांना वर्षभरापूर्वी का सुचली नाही? निवडणुकीच्या तोंडावरच का सुचली? यातून काही निष्पन्न होणार नाही, ” असे त्यांनी यावेळी म्हटले.

हे ही वाचा:

ICC T20 WORLD CUP 2024 : विजयी मुलाला भेटण्याची आईची आतुरता पोहोचली शिगेला ; डॉक्टरांची अपॉइमेन्ट केली कॅन्सल.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss