Eknath Shinde अधिवेशनाचा शेवटचा दिवस मुख्यमंत्र्यांनी हादरवाला, पहा टीकेचे धनी कोण कोण बनले?

Eknath Shinde अधिवेशनाचा शेवटचा दिवस मुख्यमंत्र्यांनी हादरवाला, पहा टीकेचे धनी कोण कोण बनले?

नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे, पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन वादळी रूपात सुरू आहे. विरोधकांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप करत मंत्रीपदाचा राजीनामा मागितला. तर कर्नाटक विरोधी प्रस्ताव संमत करण्याची मागणी केली. आज अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर खोचक टोले लगावले. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. मागच्या पाच महिन्यापूर्वी शिवसेनेत बंड का झाले याची आठवण मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी करुन दिली. शिंदे यांनी आज विधानसभेत अनेकांना टीकेचं धनी बनवला होता.

हेही वाचा : 

Anant Ambani – Radhika Merchant यांच्या एंगेजमेंट पार्टीत, १० मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी Mika Singh ने घेतले ‘इतके’ रूपये !

शिंदे म्हणाले, उद्योग येण्यासाठी आणि जाण्यासाठी प्रिपरेशन असते, परवानग्या असतात. उद्योग बाहेर जाण्यासाठी जबाबदार कोण होते, हे सर्वंना ठावूक आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी मी त्यावेळी पंतप्रधान मोदींना फोन लावला होता. तेव्हा मोदी म्हणाले की, शिंदेजी कोणताही मोठा उद्योग दोन-तीन महिन्यात इथून तिथं जात नसतो. तिथल्या सरकारकडून उद्योगांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना काय ठावूक होतं की, सरकार बदलणार? त्यामुळे ते उद्योग निघून गेले, असं मोदींनी आपल्याला सांगितल्याचं शिंदे (Maharashtra Assembly Winter Session 2022) सभागृहात म्हणाले.

आता समुद्रात होणारी तेलगळती थांबण्यासाठी वापरले जातायत मानवी केस, आश्चर्य वाटलं? तर पहा हा विडिओ

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेना राष्ट्रवादीची झाली म्हणून आम्ही बाहेर पडलो. रोज आरोप करतात. रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्यांना तुम्ही आवाहन देता. कोविड असताना आम्ही रस्त्यावर उतरलो, लोकांना दिलासा दिला. आजही मी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आहे. जयंत पाटील आज सभागृहात नाहीत, ते पाहिजे होते. जयंत पाटील म्हणाले राष्ट्रवादीची शिवसेना झाली. मुख्यमंत्री यांच्या लालसेपायी ज्यांनी त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मांडीला मांडी लावून कोण बसलं. बाळासाहेबांचे विचार ज्यांनी विकले त्यांनी सांगायची गरज नाही. हिऱ्याच्या पोटी गारगोटी, यापुढे मी काही बोलत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री म्हणाले की, चुका सुधारल्यानंतर माणूस सुधारतो. आम्ही वर्षावर नंतर गेलो तर तिकडे ‘वर्षा’वर पाटीभर लिंब सापडली. प्रबोधनकार ठाकरेंचे नातू लिंबू टिंबूची भाषा करु लागले. रेशीम बागेत गेल्यानंतर अनेकांनी आम्हाला हिणवलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं काम करायचं म्हणून आम्ही रेशीम बागेत गेलो, गोविंदबागेत गेलो नाही, असंही ते म्हणाले.

मंत्रालयात बोगस भरतीप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मागणीनंतर देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Exit mobile version