spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्राला धोका, मंत्र्यांना खोका… आजही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

महाराष्ट्र राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Winter Session)आज 9 वा दिवस असून आज सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Winter Session) आज ९ वा दिवस असून आज सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आक्रमक पावित्र्यात असलेल्या विरोधकांकडून आजही आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चार मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. तर, विरोधकांच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावले आहे.

विधिमंडळ अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) दुसऱ्या आठवड्यातील चौथ्या दिवसाचं कामकाज सुरु झालं आहे. आजही विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक सूर आळवला. “हकालपट्टी करा, हकालपट्टी करा.. भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करा”, “शेतकऱ्यांना धोका, मंत्र्यांना खोका”, “विदर्भाला धोका, महाराष्ट्राला धोका, मंत्र्यांना खोका… खाऊन खाऊन ५० खोके, माजलेत बोके माजलेत बोके… शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान… कुणी उद्योग घ्या, कुणी सबसिडी घ्या तुम्ही खोके घ्या… अशा घोषणा देत आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आज हिवाळी अधिवेशनाचा नववा दिवस असून गायरान जमीन आणि उद्योगमंत्र्यांनी केलेल्या अजब उद्योगाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार निदर्शने केली.

महाराष्ट्रासाठी खोके नवीन नाही. गाव, वाडे, तांडे इथपर्यंत खोके पोहोचले आहेत. बैलपोळ्यामध्ये बैलांच्या झोळीवर देखील खोके होते. सभागृहातील या बोक्यांनी खोके खाल्ले आणि माजले देखील. हे आम्ही खोके आणि बोके घेऊन प्रतिकात्मक आंदोलन केले असल्याचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), नाना पटोले (Nana Patole), रोहित पवार (Rohit Pawar), यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), धनंजय मुंडे (Dhananjay Munde), जितेंद्र आव्हाड भास्कर जाधव, सचिन अहीर, विकास ठाकरे यांच्यासह सर्व विरोधी पक्षाचे आमदार सहभागी झाले होते.

हे ही वाचा:

Anil Deshmukh: तुरुंगा बाहेर येताच अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

PM Modi Mother Health मोदींच्या मातोश्री विषयी खासदार राहुल गांधींचे भावुक ट्विट

कल्याण डोंबिवली पालिकेच्या ठेकेदारानेंच केली वीज चोरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss