राक्षसी महत्त्वकांक्षेसाठी महाराष्ट्र मागे पडतोय, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

राक्षसी महत्त्वकांक्षेसाठी महाराष्ट्र मागे पडतोय, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती देताना शिवसेना(ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. येणाऱ्या अधिवेशनावर चर्चा झाली आणि हे होत असताना आपण बघत असाल की महाराष्ट्रात जे काही सध्या सुरू आहे, जी परिस्थिती आहे. हे घटनाबाह्य सरकार जसं न काम करता, नुसतं रोज घोषणा करत आहे त्यावरही चर्चा झाली.”

“एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय. उदय सामंत (Uday Samantha) यांना उद्योग मंत्री (Industries Minister) म्हणून काम करताना मी कधीच पाहिलेलं नाही. राज्य सरकारने त्यांना या संपूर्ण प्रोसेसमधून बाहेर ठेवलेलं आहे. ज्यांचा या खात्याशी संबंध नाही ते का उत्तर देत आहेत. ज्यांना मी प्रश्न विचारले, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना मी आव्हान दिलेलं आहे. तुम्ही मंचावर बसा, मीडियासमोर आणि माझ्यासमोर डिबेट करा,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

याशिवाय, मुंबईत पसरत असलेल्या गोवरच्या (measles) साथीबाबत बोलताना आदित्य ठाकरेंनी म्हटले की, “आजपण मी वाचलं आहे की बारा मुलांचा मृत्यू झालेला आहे. मात्र सरकारकडू किंवा मंत्र्यांकडून काहीही बुलेटीन आलेलं नाही. अद्यापही कुठलही ब्रिफिंग झालेलं नाही, जसं आम्ही हाताळत होतो. प्रत्येक दिवशी बुलेटीन यायचं. मुख्यमंत्री स्वत: फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांशी संवाद साधायचे. तसं कुठेही सत्य परिस्थिती लोकांच्या समोर आलेली नाही. दुसऱ्या बाजूला सचिवांची बदली होते, तसेच जर आपण बघितलं तर एकंदरितच केंद्र सरकारकडून एक सूचना आलेली आहे, ज्यात सांगितलेलं आहे की महाराष्ट्राने जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. अशी नोट कधी कोविडच्या काळात आली नव्हती.”

हे ही वाचा : 

शास्त्रज्ञांनी घोषित केलेला ४८,५०० वर्ष जुना ‘झोम्बी व्हायरस नेमका काय आहे ? पहा

कुंभमळ्यापूर्वीच नाशिक महानगरपालिका आणि साधू महंतांमध्ये वाद रंगला

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version