Monday, July 1, 2024

Latest Posts

Maharashtra Budget 2024: घोषणांचा एवढा पाऊस, CM Eknatth Shinde यांना स्वतःलाच माहीत नाही, Varsha Gaikwad यांचा मिश्किल टोला

काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. "बजेट मध्ये एवढा योजनांचा पाऊस झाला की मुख्यमंत्री यांना स्वतःलाच माहिती नाही ते पुढे कसं घेऊन जायचं," अश्या शब्दात वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली.

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२४ (Maharashtra Budget 2024) काल (शुक्रवार, २८ जून) पार पडला. यावरून राज्यातील महायुती सरकारवर (Mahayuti Government) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी जोरदार टीका केली. अश्यातच, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. “बजेट मध्ये एवढा योजनांचा पाऊस झाला की मुख्यमंत्री यांना स्वतःलाच माहिती नाही ते पुढे कसं घेऊन जायचं,” अश्या शब्दात वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली.

वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधत बजेटवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “माझा प्रश्न आहे लेक लाडकी योजनेच काय झालं? आम्ही सुकन्या सुरू केली त्याला बदलून लेक भाग्यश्री आणली… भाग्यश्रीला बदलून लेक लाडकी योजना आणली. मात्र त्याचे लाभार्थी किती झाले आहे. याची संख्या सरकारने मला उपलब्ध करून द्यावी. इलेक्शनच्या तीन महिन्याआधी ही योजना जाहीर केली. दोन अडीच वर्षापासून तुमच सरकार आहे. मात्र इलेक्शनच्या बरोबर आधी तुम्ही ही योजना जाहीर केली. मात्र तुम्ही केलेल काम तुम्हाला वाटलं लोक विसरले असतील, मात्र ते विसरले नाही आहे.”

त्या पुढे म्हणाल्या,”राज्यात गॅस दर बाराशे होता तेव्हा राजस्थानमध्ये पाचशे रुपये होता. दक्षिण भारतात आम्ही महिलांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये टाकले. न्याय देणार तेव्हा आम्ही बोललो होतो की एक लाख रुपये महिलांना मिळणार हे सर्व आमच्या योजना आहे. तुम्ही स्वतः काय आणलं? महिलांविषयी तुमच धोरण काय आहे? ते आम्हाला माहिती आहे महिला मंत्री करायला तुमची धोरण नव्हती. शिवसेना आणि भाजप यांनी एकही महिला मंत्री केलेली नाह. त्यामुळे त्यांचं महिलांबद्दल धोरण काय आहे ते मला सांगायची आवश्यकता नाही. एवढा योजनांचा पाऊस झाला आहे की मुख्यमंत्री यांना स्वतःलाच माहिती नाही ते पुढे कसं घेऊन जायचं. कदाचित त्यांना समजलं असेल की मी पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही. ४०० पार बोलणाऱ्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवली मोदी सरकार बोलणारे आता एनडीए सरकार बोलतात.”

धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल (Dharavi Redevelopment Project) बोलताना त्या म्हणाल्या, “धारावीच डेव्हलपमेंट करा ही संकल्पना आम्हीच २००४ मध्ये मांडली. टेंडरची प्रक्रिया सुरू झाली. मात्र त्यानंतर टेंडर चा मॅन्युफिलेशन करण्यात आलं त्यानंतर डीसी रूल बदलण्यात आले ते पण फक्त एका व्यक्तीच्या फायद्या साठी बदलले गेले. मुंबईतील अनेक जमिनी हडपण्याचा डाव सुरू आहे. आमची मागणी आहे की धारावीकरांना धारावीतच घर मिळावं तिकडेच ट्रांजिस्ट कॅम्प बांधावं. मग हे सर्वे जमीन कशाला पाहिजे तुम्हाला? मुंबईतील अनेक प्राईम स्पॉटच्या जमिनी त्यांच्या मित्रांना देण्याचा काम सुरू आहे का? जीआर देखील काढण्यात आला. मात्र जीआर सांगून देखील रद्द करण्यात येत नाही आहे. सध्या मुंबईमध्ये जो जमीन सरकार की वो अदानी की असं सध्या सुरू आहे. मी दिल्ली मध्ये हा आवाज उचलणार आहे,” असे त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

पुर्नविकासाला विरोध नाही, धारावीकरांचा विकास होतो की नाही हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे: Aditya Thackeray

Delhi Airport Accident: Prakash Ambedkar यांची BJP, Congress वर जोरदार टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss