Maharashtra Budget Session, दुसऱ्या दिवशी विधानभवनाचा परिसर दणाणला, गळ्यात कांद्याच्या – कापसाच्या माळा घालत राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक

महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल दि २७ फेब्रुवारीपासून (सोमवार) सुरु झालं आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना घेरण्याची तयारी मोठ्या प्रमाणात केली आहे.

Maharashtra Budget Session, दुसऱ्या दिवशी विधानभवनाचा परिसर दणाणला, गळ्यात कांद्याच्या – कापसाच्या माळा घालत राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक

महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल दि २७ फेब्रुवारीपासून (सोमवार) सुरु झालं आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना घेरण्याची तयारी मोठ्या प्रमाणात केली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आज विरोधकांनी विधानभवनाचा परिसर दणाणून टाकलं आहे.

राज्यातील कांदा उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळत नसल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी कांदा आणि कापसाच्या माळा घालून महाविकास आघाडीचे आमदार शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो… कांद्याला भाव मिळालाच पाहिजे… कापसाला भाव मिळालाच पाहिजे… हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे… दोन रुपयाचा चेक देणार्‍या सरकारचा निषेध असो… शेतकऱ्यांची चेष्टा करणार्‍या सरकारचा निषेध असो… गद्दार सरकार जोमात, शेतकरी मात्र कोमात… कांदा, कापसाने रडवलं सरकारने कमावलं, वा रे सरकार खोके सरकार… शेतकऱ्यांचा कांदा सरकारने केला वांदा… अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो… कांद्याला भाव मिळालाच पाहिजे… कापसाला भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुरुवातीलाच विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

 

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मागील महिन्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत आहे. त्यावरून ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून कांद्याला योग्य दर मिळावा यासाठी निदर्शने करीत आहे. मात्र, निदर्शने करूनही कांद्याला भाव मिळत नाही. त्यामुळे आता कांद्याचे लिलावच बंद पाडण्याचा निर्णय घेत लासलगाव बाजार समितीत महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी आमदार कांद्याला भाव मिळावा म्हणून विधान भवनात कांदे घेऊन दाखल झाले आहे. इतकेच नव्हे तर विरोधकांनी गळ्यात कापूस, लसूण आणि कांद्याची माळ घातली असल्याचे पाहायला मिळाले. विक्री झालेल्या कांद्याला प्रती किलो दहा रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली आहे तर कांद्याला प्रतीकिलो ३० रुपये असा हमीभाव द्यावा अशी दुसरी मागणी करत शेतकरी आक्रमक झाले आहेत.

 

हे ही वाचा :

The CSR Journal चा प्रतिष्ठेचा ‘लीडरशीप फॉर सोशल चेंज अवॉर्ड’ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना बहाल..!

Maharashtra Assembly Budget Session, आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु, नव्या राज्यपालांनी केले अभिवादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version