मोठी बातमी – उद्या होणार महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार

गेल्या ३८ दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार हा रखडला होता. मंत्री मंडळाचा विस्तार हा कधी होणार हा प्रश्न सर्वाना पडला होता.

मोठी बातमी – उद्या होणार महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार

Cabinet expansion

मुंबई :- गेल्या ३८ दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार हा रखडला होता. मंत्री मंडळाचा विस्तार हा कधी होणार हा प्रश्न सर्वाना पडला होता. परंतु अखेर मंत्री मंडळ विस्ताराची तारीख ही अखेर ठरली आहे. उद्या दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची शक्यता हि वर्तवली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnvis) यांच्यात एक महत्त्वाची बैठक हि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुखमंत्र्यांच्या निवासस्थानी नंदनवनमध्ये दाखल झाले आहेत. सगळं ठरलेलं असून शक्य झाल्यास आज रात्रीपर्यंत देखील शपथविधी हा उरकला जाऊ शकतो,  अशी माहिती आहे. १० ते १२ मंत्री यावेळी शपथ घेतील अशी देखील माहिती आहे.

राज्यातील मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet) विस्तार हा महिना उलटून गेला तरी झालेला नाही आहे. तब्ब्ल ३८ दिवस झालेले आहेत परंतु मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त काही मिळत न्हवता. मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या विस्तारात गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे ही मंत्रिमंडळात असणार आहेत. पण विस्तारानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर दुसरीकडे विधिमंडळ सचिवांनी सर्व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.  पावसाळी अधिवेशनासंदर्भात ही बैठक बोलावलण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समजले आहे. म्हणजेच मंत्रिमंडळ विस्तार देखील लवकरच होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

तसेच लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण किंवा अडथळा नाही. खात्यांची जबाबदारी सचिवांकडे दिली आहे. कोणत्याही खात्याचे काम थांबवले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते घेत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

हे ही वाचा :-

मुख्यमंत्री शिंदे आ. संतोष बांगर यांच्या कावड यात्रेत सहभागी होणार, हिंगोलीत शिवसैनिकांचे शक्तीप्रदर्शन

Exit mobile version