spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, महायुतीमध्ये जागावाटपावर चर्चा होणार का?

सध्या राज्यसह देशाच्या राजकारणात अनेक घडामोडींना चांगलाच वेग हा आला आहे. अश्यातच आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यावर आहेत.

Eknath Shinde Delhi Visit: सध्या राज्यसह देशाच्या राजकारणात अनेक घडामोडींना चांगलाच वेग हा आला आहे. अश्यातच आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यावर आहेत. उद्या सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या NITI आयोगाच्या बैठकीत ते सहभागी होतील . एकनाथ शिंदे आज रात्री ८ वाजता दिल्लीत पोहोचतील. यासोबतच देवेंद्र फडणवीसही दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. दिल्लीत भाजपच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार असून, त्यात फडणवीसही सहभागी होणार आहेत. राज्यातील दोन बडे नेते दिल्ल्ली दौऱ्यावर आहेत त्यामुळे आता चर्चाना चांगलाच वेग आला आहे.

यावेळी शिंदे आणि फडणवीस यांच्यात स्वतंत्र राजकीय बैठक होण्याची शक्यता असून त्यात विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होऊन जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुती आघाडीच्या नेत्यांनी आपापली तयारी सुरू केली आहे. भाजप महाराष्ट्रात १५० जागांवर निवडणूक लढवणार आहे. सत्ताधारी आघाडीचे नेते एकत्र भेटून जागावाटपाबाबत चर्चा करणार असल्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १५२ जागांवर निवडणूक लढवली होती.

 

भाजपच्या बैठकीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांचीही बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना खासदार-आमदारांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल लक्षात घेऊन अधिकाधिक जागांवर निवडणूक लढवावी, अशी सूचना केली. वृत्तानुसार, शिवसेना महायुतीकडे १२५ जागांची मागणी करत आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीने ८० जागांवर दावा केला आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत ८० जागा लढवणार असून या जागा निवडण्यासाठी पक्षाने राज्यभर सर्वेक्षण सुरू केले आहे.

 

हे ही वाचा:

Pune Monsoon Updates: दुर्घटना टाळण्यासाठी स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्या, Ajit Pawar यांचे नागरिकांना आवाहन

पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर, बचाव कार्य सुरू CM Shinde यांची माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss