spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार दोन टप्प्यात

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर आता नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर आता नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 12 व 13 जुलै या दरम्यान नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कोणत्या मंत्राकडे कोणते मंत्रिपद असेल हे उत्सुकतेचे ठरत आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार या मंत्रिमंडळाचा विस्तार दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षातील काही ज्येष्ठ नेते मंत्रीपदाची शपथ घेतील उर्वरित मंत्री पदाचा विस्तार हा राष्ट्रपती निवडणुकीच्या नंतर केला जाईल.18 जुलै रोजी राष्ट्रपती निवडणूक होण्याची शक्यता असून 22 जुलै रोजी देशातील नवा राष्ट्रपती निश्चित होईल. या राष्ट्रपती निवडणुकीसाठी सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडी तर्फे द्रोपदी मुर्म तर विरोधी पक्षातर्फे यशवंत सिन्हा या उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आले आहे.

हेही वाचा :

हार्बर लाईनवरून करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, दोन तासांचा इमर्जन्सी मेगाब्लॉक

नवा सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये गृह आणि अर्थ ही महत्त्वाची खाती भाजपकडे असतील तर महसूल खाती ही शिंदे गटाकडे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रे ही धोरणात्मक निर्णयाशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळाच्या सदस्याने मंजुरी दिल्यानंतरही अनेक फायलींना मुख्यमंत्री मंजूर करणे आवश्यक असेल. मंत्रालयातील काम ठप्प झाल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होणे गरजेचे आहे.

सेनेला आणखीन एक झटका; शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा राजीनामा

Latest Posts

Don't Miss