spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्राला केवळ २ ते ३ तास झोपणारा मुख्यमंत्री मिळालाय, दीपक केसरकारांची प्रतिक्रिया

दीड महिन्यापूर्वी शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यत सत्ताबदल झाला आणि एकनाथ शिंदे हे मुखमंत्री झाले.

मुंबई :- दीड महिन्यापूर्वी शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यत सत्ताबदल झाला आणि एकनाथ शिंदे हे मुखमंत्री झाले. तर शिंदे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडे शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून जबाबदारी देण्यात आली.

मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे हे सातत्यानं दौरे करताना दिसत आहेत. अगदी मध्यरात्रीपर्यंत काही कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली होती. याविषयी बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी त्यांची स्तुती केली आहे. केसरकर यांनी म्हटलं आहे की, रात्री केवळ दोन ते तीन तास झोपणारा व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून मिळाले आहेत. त्यांचा उपयोग राज्याने करून घेतला पाहिजे, राजकारण थोडं बाजूला ठेवलं पाहिजे. तसेच पुढे संजय शिरसाठ यांच्या ट्विट बद्दल विचारले असता दीपक केसरकर म्हणाले, संजय शिरसाट यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. पहिल्या टप्प्यात संधी मिळाली नाही तरी दुसऱ्या टप्प्यात त्यांना संधी मिळणार आहे. भरत गोगावले, बच्चू कडू यांना देखील संधी मिळणार आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असंही ते म्हणाले.

पुढे केसरकर म्हणाले की, पूरग्रस्त किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. ती मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. कुठेही चुकीची घटना घडणार नाही. पंचनामे करून मदत दिली जाणार असल्याचे देखील ते म्हणाले. तसेच सरकार अतिशय स्थिर आहे, सरकारला कोणताही धोका नाही. काल छत्रपती घराण्याच्या वंशजांची भेट घेतली, त्यांच्या संकल्पना जाणून घेतल्या. अजून विभागांचे वाटप झाले नाही, कोणते खातं मला मिळणार हे माहीत नाही. सिंधुदुर्ग हा सगळ्यात पहिला पर्यटन जिल्हा म्हणून निर्माण झाला आहे. राज्यातील देवस्थानाचे पावित्र्य राखलं पाहिजे, भाविकांना सुविधा उपलब्ध झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे, असं ते म्हणाले.

हे ही वाचा :-

मोबाईलच्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे ट्विट चुकून गेले, संजय शिरसाटांचे स्पष्टीकरण

Latest Posts

Don't Miss