Thursday, July 4, 2024

Latest Posts

Maharashtra Legislative Council Election 2024 : विधान परिषदेत १५ आमदार होणार निवृत्त ; नवे तीन सदस्य निवडणूक जिंकून परतणार सभागृहात

विधान परिषदेतून आज १५ आमदार निवृत्त होणार आहेत तर त्यांच्या जागी आता ३ नवे सदस्य निवडणूक जिंकून पुन्हा सभागृहात दाखल होणार आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेतून(Maharashtra Legislative Council Election) आज म्हणजे ४ जुलै २०२४ रोजी १५ आमदार निवृत्त होत आहेत.

 विधानसभा निवडणुकीला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वी राज्यात विधानपरिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विधानपरिषदेच्या ११ रिक्त जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. दोन वर्षांपूर्वी विधान परिषद निवडणुकीनंतरच राज्यात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह उद्धव ठाकरेंची साथ सोडली. शिंदे भाजपाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झाले. आता दोन वर्षांनी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

याच पार्श्वभूमीवर अनेक घटना या राजकीय वर्तुळात घडत आहेत. विधान परिषदेतून आज १५ आमदार निवृत्त होणार आहेत तर त्यांच्या जागी आता ३ नवे सदस्य निवडणूक जिंकून पुन्हा सभागृहात दाखल होणार आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेतून(Maharashtra Legislative Council Election) आज म्हणजे ४ जुलै २०२४ रोजी १५ आमदार निवृत्त होत आहेत. यामधील तीन आमदार पुन्हा एकदा निवडणूक जिंकून सभागृहामध्ये परतले आहेत, तर दोन आमदार आगामी विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत.

विधान परिषदेत  निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकूण पाच गडी उभे आहेत. ते म्हणजे –

  • अनिल परब (Anil Parab)
  • निरंजन डावखरे (Niranjan Davkhare)
  • किशोर दराडे (kishor Darade)
  • प्रज्ञा सातव (Prdnya Satav)
  • शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil)

यांच्यापैकी ३ आमदारांची वर्णी ही विधान परिषद निवडणुकीत लागली आहे. तर काही जण अजूनही या निवडणुकीच्या रिंगणात अडकले आहेत. ज्या आमदारांची वर्णी हा विधान परिषद निवडणुकीत लागली आहे ते आमदार म्हणजे अनिल परब, निरंजन डावखरे, किशोर दराडे यांना ही संधी मिळाली आहे.  त्यांउळे हे आमदार लवकरच विधान परिषदेत दिसून येणार आहेत. तर दुसरीकडे प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील हे विधान परिषदेने निवडणुकीच्या रिंगणामध्ये अजूनही आहेत.

निवृत्त होणारे सदस्यांची यादी :

  1. विलास पोतनीस
  2. कपिल पाटील
  3. महादेव जानकर
  4. मनीषा कायंदे
  5. भाई गिरकर
  6. बाबाजानी दुर्राणी
  7. नीलय नाईक
  8. रमेश पाटील
  9. रामराव पाटील
  10. वजाहत मिर्झा

नक्की काय असते विधान परिषद ?

देशात ६ राज्यांमध्ये विधान परिषद असून घटक राज्याचे हे वरिष्ठ सभागृह आहे. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगना आणि आंध्र प्रदेशात विधान परिषद अस्तित्वात आहेत. घटनेच्या कलम ३७० जम्मू काश्मीर विशेष तरतुदी काढण्यात आल्यानंतर कलम ३अ  अंतर्गत जम्मू काश्मीरचे क्षेत्रांत व सीमांत बदल केल्यामुळे केंद्रशासित प्रदेश निर्माण केला आहे. ३१ ऑगस्ट २०१९ पूर्वी विधानपरिषद व विधानसभा अस्तित्वात होत्या. कलम १६९(१) नुसार विधानसभेने सभासदांच्या किंवा दोन तृतीयांश सभासदांनी उपस्थितीने बहुमताने ठराव केल्यास संसद राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणते. विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी, हे घटनेने निश्चित केलेले नाही. कलम १७१ नुसार विधान परिषदेत किमान ४० सभासद किंवा विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य नसतात. विधान परिषद तत्त्वत: वरिष्ठ सभागृह असले तरी व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाला सर्वच बाबीत कमी अधिकार आहेत.

संबंधित मतदारसंघाची मतदान संख्या व उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतात. निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार विजयी होतो. पण पहिल्या पसंतीची मते कोट्याएवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मते जो पूर्ण करेल, तो उमेदवार विजयी होतो. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. यात कोणाचेही मतदान वाया जात नाही.

THE ACADEMY SCHOOL, PUNE (TAS) यांनी केली जागतिक आयआयएमयुएन परिषद आयोजित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss