spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेश सुरु, आदित्य ठाकरेंचा सरकारला दणका

आजपासून राज्यात विधीमंडळाचं पावसाळी अधिवेश सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवना बाहेर विरोधकांनी राज्यसरकार विरुद्ध आदोलन करण्यात आले. तर शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतर शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट आमनेसामने आले आहेत. राज्यातल्या नव्या शिंदे फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे. हे पावसाळी अधिवेश वादळी होणार असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात समोर आली आहेत. अधिवेशन सुरू होणार असून त्या निमित्ताने शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने येणार आले आहेत.

अजूनही सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत… ; आदित्य ठाकरे

या अधिवेशनात युवेसेना नेते आदित्य ठाकरे हे हजेरी लावणार नसल्याची चर्चा होत होती, परंतु विधानभवना बाहेर चालू असलेल्या या आंदोलनात आदित्य ठाकरे देखील सहभागी झाले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला खुले आवाहान केले आहे. ते म्हणाले, “खरा मुख्यमंत्री कोण हे जनतेला दिसून आले आहे, शिंदे गटात निष्ठेला कुठेही स्थान नाही. सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही, ज्यांना सर्व दिले त्यांनी पाठीत खंजीर खुपसला आहे. तिथे जाऊन आमदार फसलेले आहेत. अजूनही सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत..जर यायचे तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा.” असे आदित्य ठाकरे यांनी आवाहान केले.

हेही वाचा : 

“पन्नास खोके एकदम ओक, आले रे आले गद्दार आले” राज्यसरकार विरुद्ध विरोधकांची घोषणा बाजी

Latest Posts

Don't Miss