Maharashtra Municipal Corporation Election Hearing : महापालिका निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी

महापालिका निवडणुकीबाबत (Municipal Corporation Election) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज दि १९ ऑक्टोबर रोजी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे.

Maharashtra Municipal Corporation Election Hearing : महापालिका निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी

महापालिका निवडणुकीबाबत (Municipal Corporation Election) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज दि १९ ऑक्टोबर रोजी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने केलेले प्रभाग रचनेतले बदल, थेट नगराध्यक्षपदाची निवड या मुद्द्यांना कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. त्यामुळे याचा निर्णय झाल्यानंतरच महापालिका निवडणुका कधी होणार याची स्पष्टता येणार आहे. या दृष्टीने आजची सुनावणी महत्त्वाची असेल.

मे महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची सूचना केली होती. कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घ्या, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. परंतु त्यानंतर राज्यात महासत्तांतर झालं. शिंदे-फडणवीस सरकारने वॉर्ड रचना पुन्हा नव्याने करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या. महाविकास आघाडी सरकारने मुंबई महानगरपालिकेमध्ये एक सदस्यीय प्रभाग आणि इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यांचा प्रभाग केला होता. त्यानंतर शिंदे सरकारने २०१७ प्रमाणे चारचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला महाविकास आघाडीने जोरदार विरोध केला होता. त्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली होती.

जुलै महिन्यातच ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. पण ९२ नगरपरिषदांसाठी तो मार्ग उपलब्ध नसल्याने राज्य सरकार कोर्टात गेलं आहे आणि त्यामुळे सर्वच निवडणुका रखडल्या आहेत. मुंबईसह २३ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्या, २०७ नगरपालिका, १३ नगरपंचायती निवडणुकांची प्रक्रिया प्रक्रिया संदर्भातील याचिकांवर आज सुनावणी होणार आहे.

मुंबईसह राज्यातल्या अनेक महापालिकांवर सध्या प्रशासकाची नियुक्ती आहे. ६ महिन्यांची मुदतही ओलांडून गेली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या प्राथमिकतेबद्दल आज सुप्रीम कोर्टात काही युक्तिवाद अथवा टिप्पणी होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. राज्य सरकारने २ आठवडे वेळ मागितली होता. राज्य सरकारला वेळ वाढवून देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यामुळे शिंदे सरकारला दिलासा मिळाला होता. त्यानंतर आज २ आठवड्यानंतर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

हे ही वाचा:

“मंत्रीपदाला काय करता.. मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो”; शिंदे गटातील ‘या’ आमदाराचे वक्तव्य

डोंबिवलीतील प्रवाशांना गर्दीच्या वेळेत अधिक एसी लोकलची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version