spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मंत्रिमंडळ विस्ताराच्या फक्त तारखांची चर्चा, इच्छुकांचा जीव टांगणीला

राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत पण इतर खात्यांचे मंत्रीच नाही अशी सध्याची स्थिती आहे. यामुळे भाजपातील आणि एकनाथ शिंदे समर्थ गटातील इच्छुक मात्र चांगलेत चिंताग्रस्त आहेत.

मुंबई – राज्यात शिंदे सरकार येऊन आता जवळपास ११ दिवस उलटलेत..मागील ११ दिवसांत अनेक तारखा मंत्रिमंडळ विस्तारासाठी समोर आल्यात..मात्र मंत्रीमंडळ विस्तार काही होण्याचे नाव घेईना..आता पुन्हा एक तारीख समोर आली असून, आता मंत्रिमंडळ विस्तार एक तर राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु मुंबईत आल्यानंतर होईल किंवा १८ तारीखला राष्ट्रपती निवडणूक पार पडल्यानंतर  होईल अशी चर्चा सुरू झालीय..त्यामुळे या तारखांपैकी एका तारखेला तरी विस्तार होणार का असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे…
दोघांवर चाललाय राज्याचा कारभार
राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत पण इतर खात्यांचे मंत्रीच नाही अशी सध्याची स्थिती आहे. यामुळे भाजपातील आणि एकनाथ शिंदे समर्थ गटातील इच्छुक मात्र चांगलेत चिंताग्रस्त आहेत. नेमका मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आणि त्यात कुणाची वर्णी लागणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मंत्रालयात देखील याबाबत तर्क वितर्क आणि चर्चा रंगली आहे. कोणतं खातं कोणत्या गटाला मिळणार भाजपाकडे कोणती खाती येणार तर एकनाथ शिंदे गटांकडे कोणती खाती येणार, कोणत्या नेत्याला कोणत्या मंत्रिपदाची लॉटरी लागणार? मंत्रिमंडळ विस्तार होताना कोणाचा पत्ता कापला जाणार? याची सध्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग
सगळयात महत्वाचे म्हणजे विस्ताराच्या वेगवेगळ्या येणाऱ्या तारखांनी मात्र इच्छुकांची चिंता चांगलीच वाढलीय.. आधीच मंत्री पद मिळेल म्हणून काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत मात्र विस्ताराची नेमकी तारीख निश्चित होत नसल्याने शिंदे गट आणि भाजपचे इच्छुक मात्र पुरते अस्वस्थ झालेत..लवकरात लवकर विस्तार व्हावा आणि आपल्या गळ्यात एकदा मंत्रिपदाची माळ पडावी अशीच काहीशी अवस्था काहींची झालीय..त्यामुळे आषाढी झाल्यानंतर तरी आपल्याला पांडुरंग पावेल असे काहीना वाटतंय.. आता हा मंत्री मंडळ विस्तार नव्याने आलेल्या तारखांना तरी होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे..

Latest Posts

Don't Miss