Friday, June 28, 2024

Latest Posts

Maharashtra Budget Session 2024: आजचे बजेट म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’, Jayant Patil यांची मिश्किल टीका

अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केला. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ताशेरे ओढले.

महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) सुरु झाले असून आज (शुक्रवार, २८ जून) महाराष्ट्र अर्थसंकल्प (Maharashtra Interim Budget 2024) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केला. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ताशेरे ओढले असून “आजचे बजेट म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’ असेच म्हणावे लागेल,” अश्या शब्दात टीका केली आहे.

जयंत पाटील यांनी आपल्या अधिकृत “X” अकाऊंटवरून याबबाबत पोस्ट केली त्यात त्यांनी म्हंटले कि, “आजचे बजेट म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’ असेच म्हणावे लागेल. लोकसभा निवडणुकांचा चांगलाच परिणाम राज्यात झालेला दिसतोय. आता पराभव समोर दिसत असताना, आजच्या बजेटमधून शेवटचा प्रयत्न महायुती सरकारने केला आहे. हा प्रयत्न देखील तीन महिन्यांसाठी आहे. अगदी बेजबाबदारपणे मांडलेले हे बजेट आहे.”

ते पुढे म्हणाले,”महिला व बालकल्याण विभागासाठी असलेल्या बजेट पेक्षा ४६ हजार कोटींचे अधिकची प्रोव्हिजन केली आहे. मागच्या वर्षी १ लाख ३० कोटी महसुली तुटीच्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या. आता मात्र महसुली तूट २० हजार कोटींची दाखवली. ही सगळी आकडेवारीची जग्लरी आहे. निवडणुकीच्या आधी पेट्रोल डिझेलचे भाव कमी करून मग ते वाढवायचे ही पंतप्रधान मोदींची पद्धत राज्यात राबवली गेली आहे. महाराष्ट्राच्या महिलांना तुम्ही आधार देण्याचा प्रयत्न करत आहात तर तो सक्षमपणे करा. फक्त घोषणा करून ठराविक वर्गाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. कसलेही मूल्यमापन न करता हे बजेट सादर केलेले आहे.”

“एमएससीबीची मागची थकबाकी माफ करणं अपेक्षित असताना पुढची सुपारी घेणं हे जबाबदारीचे लक्षण नाही. म्हणून मी वारंवार सांगतोय की, हे बजेट फक्त दोन महिन्यांचे आहे. हे सत्तेतून बाजूला गेल्यानंतर, आम्ही ज्यावेळी सत्तेत येऊ तेव्हा जबाबदारीने महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देण्याचा काम करू. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक दिंडीला देऊ केलेली मदत अनेक वारकऱ्यांनी नाकारली आहे. शेकडो वर्षापासून सुरू असलेली महाराष्ट्रातील वारी ही स्वाभिमानाची वारी आहे. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करून मोठेपणा मिरवणे सरकारच्या दृष्टीने योग्य नाही,” अशी टीका त्यांनी केली.

हे ही वाचा:

Maharashtra Budget Session 2024: राज्यातील जनतेची दिशाभूल करणारा बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प, Nana Patole यांची टीका

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : दुर्बल घटकांसाठी अर्थ संकल्पात आणल्या नवीन योजना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss