Thursday, July 4, 2024

Latest Posts

Mahavikas Aaghadi : मुख्यमंत्री पदावरुन महाविकास आघाडीत वाद?

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) मुंबई येथे गुरुवार, २७ जून म्हणजेच आजपासून सुरु होत आहे. महायुती सरकारचे हे अधिवेशन सध्या चर्चेचा विषय झाले आहे. सदर पावसाळी अधिवेशन शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीपर्यंत सुरु राहणार आहे.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) मुंबई येथे गुरुवार, २७ जून म्हणजेच आजपासून सुरु होत आहे. महायुती सरकारचे हे अधिवेशन सध्या चर्चेचा विषय झाले आहे. सदर पावसाळी अधिवेशन शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीपर्यंत सुरु राहणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदावरुन चर्चेला उधाण आलं आहे. विधानसभेचे मैदान आता महाविकास आघाडी आणि महायुतीला खुणावत आहे. लोकसभेतील दमदार कामगिरीने महाविकास आघाडीला शंभर हत्तीचे बळ आले आहे. विधानसभेत चमकदार कामगिरी करण्यासाठी आणि मतांचा कौल आपल्या पारड्यात टाकण्यासाठी आघाडी सज्ज झाली आहे.

महायुती सरकारवर तुटून पडण्याची वेळ आली असतानाच खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुन रान पेटवले आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर न करता, महाविकास आघाडीने मतदारांकडे मत मागू नये, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली. त्यावरुन महाविकास आघाडीत आता कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर सावध भूमिका घेतली आहे. तर महायुतीने या आयत्या कोलतीवर चिमटे काढले आहेत.

आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर न ठेवून लढवणार असल्याचं ठरलं होतं. पण महाविकास आघाडीनं एकत्रितपणे घेतलेल्या निर्णयाच्या विपरीत वक्तव्य संजय राऊतांनी केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अशी अप्रत्यक्ष मागणी संजय राऊत यांची आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणार हा धोका आहे. या महाराष्ट्र आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचे काम पाहिले आहे. लोकसभेला पण त्यांच्या चेहऱ्यामुळे मतदान झाल्याचा दावा राऊतांनी आज केला. त्यानंतर महाविकास आघाडीत आतापासूनच मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावरुन शीतयुद्ध सुरु असल्याचे दिसून आले.

संजय राऊत यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. राऊतांच्या विधानावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र लढणार आहोत. मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा निवडणुकीनंतर आणि निकालानंतर ठरेल असे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा

Thane शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी CM Shinde यांचे कारवाईचे निर्देश

Litchi Fruit Benefits: लिची तुम्हाला आवडते का? फायदे वाचून व्हाल थक्क…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss