महाराष्ट्र दिनी बीकेसी मैदानावर पार पडणार मविआची Vajramuth Sabha

सध्या राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अश्यातच आता महाविकास आघाडीने देखील वज्रमूठ सभा घेण्यास देखील सुरुवात केली आहे.

महाराष्ट्र दिनी बीकेसी मैदानावर पार पडणार मविआची Vajramuth Sabha

सध्या राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अश्यातच आता महाविकास आघाडीने देखील वज्रमूठ सभा घेण्यास देखील सुरुवात केली आहे. नुकतीच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे वज्रमूठ सभा ही पार पडली. त्यानंतर महाविकस आघाडी आता मुंबईत वज्रमूठ सभा घेणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमूठ सभेला मिळालेल्या प्रतिसादानंतर महविकास आघाडी सध्या ऍक्टिव्ह मोडमध्ये पाहायला मिळत आहे.

सध्या राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वादामुळे राजकीय वातावरण हे नेहमीच तापलेले असते. त्यातच आता महाविकास आघाडीने भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट यांच्या विरोधात वज्रमूठ सभा घेण्यास सुरुवात केली. या सभेमार्फत मविआ सरकारवर चांगलाच हल्लाबोल करताना दिसत आहेत. महाविकास आघाडी संपूर्ण राज्यात तब्बल १६ वज्रमूठ सभा घेणार आहे. तसेच त्यांची एक सभा नुकतीच छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. आता पुढील सभा ही मुंबईत महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची सभा होणार आहे. या सभेमध्ये महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे असे देखील सांगितले जात आहे.

१ मे रोजी महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची मुंबईत सभा होणार आहे. महाविकास आघाडी मार्फत मुंबईतल्या बीकेसी मैदानात या दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. याच बीकेसी मैदानवर दसरा च्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याची सभा हि घेतली होती. आता महाविकास आघाडी महाराष्ट्र दिनी शिंदे सरकारवर हल्लाबोल करणार आहे.

महाविकास आघाडीने आपली वज्रमूठ सभेला मिळालेल्या यशानंतर लगेच १६ एप्रिलला नागपुरमध्ये दुसऱ्या वज्रमूठ भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरच्या सुधार प्रण्यास या मैदानावर ही सभा घेण्यात येणार आहे. मात्र या मैदानावर सभा घेण्यास भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी विरोध केला आहे. सदर मैदान हे खेळासाठी शासकीय निधीतून विकसीत करण्यात आले आहे. तसेच ऐन सुट्यांच्या दिवसात लहान मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध झाली पाहिजेत आणि तरी देखील हे मैदान राजकीय सभेसाठी का दिले जात आहे असा सवाल करत त्यांनी संबंधित विभागाला पत्र दिले आहे. तसेच नागपुरातील सुधार प्रण्यास मैदानात क्रिकेट, व्हॉलीबॉल. फुटबॉल, बास्केटबॉल आदी खेळांचे आयोजन करण्यात येते. या मैदनावर सकाळ संध्याकाळ कायम गर्दी असते. क्रीडा क्षेत्रासाठी विकसित करण्यात आलेले मैदान कोणत्याही राजकीय पक्षाला देण्यात येऊ नये. राजकीय कार्यक्रमासाठी मैदान दिल्यास त्याचा सत्यानाश होईल.असे मत कृष्णा खोपडे यांनी दिले आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नागपूर येथे घेण्यात येणार आहे.

हे ही वाचा : 

नवनीत राणांच्या टीकेवर मनीषा कायंदे यांचे प्रत्युत्तर…

जागतिक आरोग्य संघटनेचा ७५ वा जागतिक आरोग्य दिन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह खासदार,आमदारांचा ९ एप्रिलला अयोध्या दौरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version