Thursday, July 4, 2024

Latest Posts

घाबरले रे घाबरले BJP वाले घाबरले, Vidhan Bhavan परिसरात Mahavikas Aghadi चे तीव्र निदर्शन

काल लोकसभेत (Loksabha Session) काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे भाषण पार पडले. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) त्यांनी भाजप (BJP) आणि आरएसएसवर जोरदार टीका करत “जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा-हिंसा-हिंसा…द्वेष-द्वेष-द्वेषात गुंततात… तुम्ही मुळीच हिंदू नाही,” असे वक्तव्य केले होते. यावर भाजपकडून राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधण्यात आला. राहुल गांधी हिंदुविरोधी आहेत असा आरोप भाजपतर्फे करण्यात येत होता. यावरूनच महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) विधानभवन (Maharshtra Vidhan Bhavan) परिसरात जोरदार निदर्शन केले.

राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या भाष्यावरून आता विधानसभा आणि विधानपरिषदेत गोंधळ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना उबाठा आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांना शिवीगाळ करण्यात आली होती. त्यावर वातावरण अजून तापले होते. अश्यातच, आज (मंगळवार, २ जून) विधानभवन परिसरात महाविकास आघाडीनेदेखील भाजपविरोधात जोरदार निदर्शन केले. राहुल गांधींच्या भाषणानंतर खोटं नेरेटीव्ह सेट करण्यात आले, असा आरोप भाजपवर करत, “घाबरले रे घाबरले भाजप वाले घाबरले” अश्या घोषणा देण्यात आल्या.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणानंतर सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार हल्लाबोल करत आहेत. यावर मविआच्या आमदारांनी ‘राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून घोषणा दिल्या,’ असा आरोप करत या विरोधात विधानभवन परिसरात जोरदार निदर्शन केले. . “घाबरले रे घाबरले भाजप वाले घाबरले, मनुवाद हटाओ, संविधान बचाओ!” अशा घोषणा देत महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. राहुल गांधींच्या विरोधात लोकसभेतील भाषणानंतर खोटं नेरेटीव्ह सेट करण्यात आल्याचा आरोप करून त्याला विरोध म्हणून आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

लोकसभेत काल (सोमवार, १ जुलै) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होत होती. यादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चर्चेला सुरुवात करत संविधानाच्या बहाण्याने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संविधानाची प्रत हातात घेऊन राहुल गांधी यांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यांमुळे खळबळ उडाली. राहुल गांधी यांनी भाजप – आरआरएस वर टीका करत “जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा-हिंसा-हिंसा…द्वेष-द्वेष-द्वेषात गुंततात… तुम्ही मुळीच हिंदू नाही,” असे वक्तव्य केले होते. यावर पीएम मोदींनी उभे राहून निषेध व्यक्त केला आणि संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर बाब असल्याचे सांगितले.

लोकसभेत राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले, “मोदीजींनी एके दिवशी आपल्या भाषणात सांगितले की, भारताने कधीही कोणावरही हल्ला केला नाही. त्याला कारण आहे. भारत हा अहिंसेचा देश आहे, तो घाबरत नाही. आपल्या महापुरुषांनी हा संदेश दिला – घाबरू नका, घाबरू नका. शिवजी म्हणतात- घाबरू नका, घाबरू नका आणि त्रिशूळ जमिनीत गाडून टाका. दुसरीकडे, जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा-हिंसा-हिंसा…द्वेष-द्वेष-द्वेषात गुंततात… तुम्ही मुळीच हिंदू नाही. सत्याचे समर्थन करावे असे हिंदू धर्मात स्पष्ट लिहिले आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केला. पीएम मोदी आपल्या खुर्चीवरून उभे राहिले आणि त्यांनी ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर बाब असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावर राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि भाजप हा संपूर्ण हिंदू समाज नाही.

हे ही वाचा:

‘राहुल गांधी स्वतः दहशतवादी…’, रामदास आठवले यांचा हल्लाबोल

PM Narendra Modi १० वर्षांपासून ‘भीतीचे राज्य’ चालवत आहेत: Rahul Gandhi

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss