Friday, June 28, 2024

Latest Posts

Maharashtra Session 2024 : विधीमंडळ परिसरात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी

दरम्यान,आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit pawar)हे आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.अंतरिम अर्थसंकल्पात नागरिकांसाठी नेमक्या काय योजना असणार आणि यंदाचं हे बजेट नागरिकांना दिलासा देणार का हे समजेल. 

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला(Maharashtra Monsoon Session 2024) काल २७ जून पासूनच सुरुवात झाली. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु झाली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर अनेक प्रश्नांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केले. अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. मात्र त्या आधीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये बॅनर वॉर करत आंदोलन केले आहे.

सकाळ पासून विरोधकांनी “धिक्कार असो , धिक्कार असो”अशा घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला तर गळात आणि हातात गाजर घेऊन शेजारी तुपाशी महाराष्ट्र उपाशी, अबकी बार महाराष्ट्रातील उद्योगधंदे सीमापार,शेतकऱ्यांची वीज बिल माफ केली पाहिजे अशा आशयाचे बॅनगर दाखवत जोरदार असे आंदोलन केले.कॉंग्रेस(Congress),शिवसेना उबाठा(Shivsenaubt) आणि राष्ट्रवादीकॉंग्रेस शरदचंद्र पवार(rashtravadisharadchandrapawar ) या तिन्ही पक्षांकडून आंदोलन करण्यात आले. विरोधकांच्या या आंदोलनाला सत्ताधाऱ्यांनी देखील बॅनर दाखवत आणि आंदोलनामार्फत चोख उत्तर देत बॅनरवॉर केले.

“एक मोदी सब पे भारी. गिरे तो भी टांग उपर”अशा घोषणा देत विरोधकांना डिवचले. शिंदेंच्या शिवसेनेचे(Shivsena) आणि भाजपच्या(BJP) काही आमदारांनी मिळून या घोषणाबाजी देण्यात आल्या. आमदार भरत गोगवले(bharat Gogawale), आमदार संजय गायकवाड(sanjay gaikwad), आ.आमश्या पाडवी(Amshya padvi), दादा भूसे(Dada bhuse), मंत्री अतुल सावे(Atul save) आणि महिला आमदारांनी विरोधकांविरोधात घोषणाबाजी करत विधिमंडळ परिसरात दोन्ही गटात जोरदार खडाजंगी पहायला मिळाली.

दरम्यान,आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit pawar)हे आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.अंतरिम अर्थसंकल्पात नागरिकांसाठी नेमक्या काय योजना असणार आणि यंदाचं हे बजेट नागरिकांना दिलासा देणार का हे समजेल.

हे ही वाचा:

India Vs England: टीम इंडियाची बाजी, अंतिम सामन्यासाठी खेळाडू सज्ज

कुरकुरीत भेंडी करताना ‘या’ टिप्स वापरून पाहा, नक्कीच होईल फायदा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss