अंधेरीची जागा महाविकास आघाडी जिंकणार; अमोल मिटकरींनी केला विश्वास व्यक्त

शिवसेनेचे अधिकृत धनुष्यबाण (Shivsena) हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. शिवसेनेला मशाल हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळाले आहे. तसेच शिंदे गट बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray ) नावाची मागणी करुन चिन्हाची मागणी करत आहेत.

अंधेरीची जागा महाविकास आघाडी जिंकणार; अमोल मिटकरींनी केला विश्वास व्यक्त

शिवसेनेचे अधिकृत धनुष्यबाण (Shivsena) हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. शिवसेनेला मशाल हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळाले आहे. तसेच शिंदे गट बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray ) नावाची मागणी करुन चिन्हाची मागणी करत आहेत. मात्र आमचे त्यांना आव्हान आहे की, बाळासाहेब ठाकरे ऐवजी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करा. तुम्हाला ताकद दिसून येईल, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

आज अमोल मिटकरी हे बारामतीत (Baramati) बोलत होते. तेव्हा ते म्हणाले अंधेरीच्या पोटनिवडणूकीची जागा महाविकास आघाडी जिंकेल. चिन्ह जरी गोठवलं असलं तरी शिवसैनिकांचे रक्त पेटवले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे अंधेरीची जागा महाविकास आघाडी जिंकणार आणि मुंबई महापालिकेत सुद्धा भगवा फडकवणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच भावना गवळी, अडसूळ, प्रतापराव जाधव ही सर्व मंडळी ईडीच्या धाकाने शिंदे गटात जाऊन बसले. शिवतारे यांचे आता वय वाढले. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. शिवतारेंची लायकी काय हे अजित पवारांनी अनेकदा दाखवून दिली आहे. राष्ट्रवादीने शिवसेना संपवली असा आरोप शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला होता. यावर मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जनसंघ, काँग्रेस, या पक्षांनाही वेगवेगळी चिन्हे बदलावी लागली. त्यामुळे फारसा फरक पडला नाही. बाळासाहेब ठाकरे हे नाव ज्या ठिकाणी आहे. तेथे शिवसैनिकांचे रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मशाल चिन्हालाच लोक पसंती देतील. मशाल हे जसे क्रांतीचे प्रतीक आहे. तसेच शिवसेनाही क्रांतीचे प्रतीक आहे. मित्रपक्ष म्हणून आमचा शिवसेनेला पाठिंबा असल्याचं मिटकरी यांनी सांगितलं आहे. बारामती अँग्रोवर कारवाई करावी अशा मागणीचे पत्र आयुक्तांना दिले आहे. बारामती अँग्रोचा भ्रष्ट कारभार नाही आहे. राम शिंदेंच्या मनात आकस आहे की त्यांच्या हातातील मतदारसंघ रोहित पवारांनी घेतला. त्यांना विधानपरिषदेत घेतले. त्यांना मंत्रिपद देऊन भाजप त्यांची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करेल. बारामती अँग्रोच्या कितीही चौकशा लावल्या तरी अँग्रोचा कारभार स्वच्छ आहे. अनिल परब यांचे रिसॉर्ट पडणार, असं किरीट सोमय्या म्हणत होते मात्र आता दिवाळी आली. बोलायचे आणि मूळ मुद्यावरुन लक्ष हटवायचे हेच शिंदे गट आणि भाजप करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

हे ही वाचा :

Raj Thackeray : उध्दव-शिंदेना जनता कंटाळलीय, शिवसेनेला सहानुभूती मिळणार नाही

दिवाळी सणाच्या तोंडावर कोरोनाच्या अधिक घातक नव्या व्हेरिएंटची चाहूल, आरोग्य विभागाचा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version