spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Nagpur : नागपुरात भाजपला मोठा धक्का, 13 पैकी 9 पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय

केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या गृह जिल्ह्यात पंचायत समिती सभापती, उपसभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारली असून भाजपला मोठा धक्का बसला आहे. प्रतिष्ठेच्या लढतीत नागपूर जिल्ह्यातील तेरा पंचायत समितीचे सभापती व उपसभापती निवडणूकीत काँग्रेसचे ९ ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ ठिकाणी सभापती निवडून आले असून काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा : 

अंधेरीत ऋतुजा लटकेना सहानुभूती की पटेलांना पाठिंबा?

नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये भाजपचा कुठल्याही पंचायत समितीत सभापती होऊ शकला नाही, तर अवघ्या दोन पंचायत समितीत उपसभापती झाले आहेत. मात्र, शिंदे गटाचा एक उपसभापती झाला आहे. १३ पंचायत समिती पैकी ९ पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे सभापती निवडून आले आहेत. हा भाजपसाठी मोठा धक्का आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार १३ पंचायत समितीच्या निकाला पैकी काँग्रेस ९, राष्ट्रवादी काँग्रेस ३, शिवसेना १ जागेवर विजयी झाले आहे. तर, नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस- उमरेड, कुही, भिवापूर, कामठी, मौदा, पारशिवनी, सावनेर, कळमेश्वर, नागपूर (ग्रामिण), राष्ट्रवादी काँग्रेस – हिंगणा, काटोल, नरखेड, रामटेक – सेना या तालुक्यात पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडणूका पार पडल्या. माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात व नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने यश मिळविले.व शिंदे गटाचाही रामटेक पंचायत समितीवर एक सभापती झालेला आहे. फक्त रामटेक आणि मौदा तालुक्यात भाजपचे उपसभापती झालेले आहेत. नागपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघात विजयी झालेल्या पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांचे राजेंद्र मुळक यांनी अभिनंदन केले आहे.

या आजरांमुळे डोळ्यांचे आरोग्य बिगडू शकते, लक्षणे दिसल्यास ताबडतोब करून घ्या उपचार

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss