Tuesday, July 2, 2024

Latest Posts

महायुतीची रात्री उशिरापर्यंत बैठक…नेमकं काय शिजतंय?

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. साधारण

विधानसभेच्या निवडणुका (Vidhansabha Election 2024) जवळ आल्या आहेत. आणि त्यामुळेच सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहे. आता अश्यात एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. साधारण दीड तास ही मिटिंग चालू होती आणि या मीटिंगदरमन अनेक गोष्टींवर चर्चा झाल्याचं समजत. या मीटिंगदरम्यान शुक्रवारपासून सुरु होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन, राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा झाल्याचं समोर येत आहे.

आगामी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी महायुतीमधील अनेक नावं इच्छुक आहेत. त्यामुळे कुणाला संधी द्यायची? इतरांची नाराजी कशी दूर करायची? या मोठ्या प्रश्नाच्या अनुषंगानं कालची ही मिटिंग झाल्याच्या माहिती मिळत आहे. लोकसभेत महायुतीची कामगिरी लक्षात ठेवता येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या बैठक महत्वपूर्ण मानल्या जात आहेत. परंतु महत्वपूर्ण बाब म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात उशिरापर्यंत चालणारी ही पहिली बैठक नव्हे. याआधीही दोन वेळा उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या बैठक झाल्या होत्या. तब्बल दीड तास बंद दाराआड या चर्चा रंगल्या होत्या.

आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभारी व सहप्रभारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. भूपेंद्र यादव हे भाजपचे महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी तर अश्विनी वैष्णव यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हे ही वाचा

PUNE HIT-AND-RUN: अपघाताप्रकरणी एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना केले मोठे आवाहन..

Chandrakant Patil यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Rohit Pawar आणि Amol Mitakari संतापून म्हणाले, दादा तुम्ही….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Latest Posts

Don't Miss