MAHAYUTI च्या ‘या’ नेत्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन केले वादग्रस्त विधान..

MAHAYUTI च्या ‘या’ नेत्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन केले वादग्रस्त विधान..

सध्या महायुतीची विधानसभा निवडुकीच्या पार्श्वभूमीवर जय्यद तयारी सुरु आहे. यातील प्रत्येक पक्ष नेते हे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही योजना पुढे घेऊन जात आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (mukhyamantri majhi ladki bahin yojana) घोषणा करण्यात आली आहे. घोषणेपासून या योजनेला राज्यातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आतापर्यंत या योजनेसाठी एक कोटींहून अधिक महिलांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले असून अजूनही अर्ज केले जात आहेत. या योजनेच्या प्रचारासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र दुसरीकडे विरोधकांकडून या योजनेवर टीकाही केली जात आहे. त्यातच आता अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा (MLA ravi rana) यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन वादग्रस्त विधान केलं आहे.”आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपयांवरून ३ हजार रुपये करू, मात्र जे मला आशीर्वाद देणार नाही, १५०० रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार” असं धक्कादायक विधान आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केलं आहे.

अमरावतीत आज आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात महिलांना संबोधित करताना आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपयांवरून३हजार रुपये करू. आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. जे मला आशीर्वाद देणार नाही, मी तुमचा भाऊ असून १५०० रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार,असं धक्कादायक विधान आमदार रवी राणा यांनी केलं आहे. ज्याचं खाल्लं त्याला जागलं पाहिजे. सरकार देत राहते. पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असंही रवी राणा म्हणाले.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुलभतेने होण्यासाठी ज्या जिल्ह्यात विधानसभा क्षेत्र विकास समिती गठीत झाली नाही किंवा विधानसभा क्षेत्र समितीकडून पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम झाली नाही अशा जिल्ह्याची यादी जिल्हाधिकारी यांनी पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवावी. यासाठी विधानसभा क्षेत्र समितीची मान्यता घ्यावी. जर समितीची मान्यता घेण्यास समस्या असतील, तर जिल्ह्यांचे पालकमंत्री यांची मान्यता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमबजावणी संदर्भात हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

BJP, Mahayuti च्या विचाराला जनतेची नापसंदी, मराठवाड्यात परिवर्तनाची लाट: Nana Patole

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version