Majha Maharashtra Majha Vision, देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट, ‘मविआ सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव’

आज 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमांचं आयोजन दिवसभर करण्यात आलं आहे.

Majha Maharashtra Majha Vision, देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट, ‘मविआ सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव’

आज ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमांचं आयोजन दिवसभर करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह राज्यातले प्रमुख नेत्यांशी दिलखुलास संवाद साधला जाणार आहे. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, राष्ट्रवादी नेते जयंत पाटील, सुधीर मुनगंटीवार, उदय सामंत, संजय राऊत यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, ठाकरे सरकारच्या काळामध्ये मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे मुंबई सीपी संजय पांडे यांना दिलं होतं म्हणतं मोठा गौप्यस्फोट केला आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच नेतेमंडळी हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे. अशातच सत्ताधारी भाजपकडून विरोधक नेत्यांवर ईडीची चौकशी लावत असल्याचे आरोप सातत्याने होत असतात. महाविकास आघाडी सरकार असताना मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेत तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिलं गेलं होतं असा मोठा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी ‘एबीपी माझा’ वाहिनीनं आयोजित केलेल्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ कार्यक्रमात केला आहे. तसेच ते पुढे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली आहे. मी कधीच राजकीय वैर मनात ठेवत नाही. उद्धव ठाकरेंनीच मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी बंद केले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच या कार्यक्रमात पुढे देवेंद्र फणवीस म्हणाले, “उद्धवजींनीच माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले. माझं आजही त्यांच्याशी कोणतंही वैर नाही. मनात कोणतीही कटुता नाही. पण पाच वर्ष ज्यांच्यासोबत काम केलं. त्यांनी माझा एक फोनही उचलला नाही. त्यांनी सौजन्य म्हणूनही माझ्याशी बोलणं योग्य समजलं नाही. उलट गेल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर वेगवेगळ्या केसेस कशा टाकता येतील यासाठीचे प्रयत्न झाले. कुठल्याही परिस्थितीत याला अडकवा, आत टाका असं टार्गेटच तत्कालीन सीपी संजय पांडे यांना देण्यात आले होते”, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

हे ही वाचा:

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार ‘झिम्मा २’

राज्यपाल आणि वाद, भगतसिंह कोश्यारींनी केलेली वादग्रस्त विधान कोणती घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version