उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यावर मोठी कारवाई; शरद कोळींच्या भाषणावर बंदी

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यावर मोठी कारवाई; शरद कोळींच्या भाषणावर बंदी

सध्या उद्धव ठाकरे गटाला एका मागून एक धक्के बसत आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेतील वक्ते आणि युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना भाषण करण्यास बंदी घातली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या भाषणावर बंदी घातल्यामुळे जिल्ह्यातील ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानंतर शरद कोळी पुन्हा कार्यक्रमात भाषण करतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात झालेल्या महाप्रबोधन सभेत सुषमा अंधारे यांच्या समवेत ठाकरे गटाचे प्रमुख वक्ते तथा युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी भाषण केलं. या दरम्यान शरद कोळी यांनी गुलाबराव पाटील आणि गुजर समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी कोळी यांना भाषण करण्यास बंदी घातली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलीस सुषमा अंधारे आणि शरद कोळी ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या पी प्राईड हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यांनी कोळी यांना भाषण करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी भाषणास का बंदी घातली याचीदेखील कोळी यांना माहिती दिली. दरम्यान, पोलीस हॉटेलमध्ये दाखल झाल्याने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शरद कोळी यांना अटक करण्यासाठी पोलीस हॉटेलमध्ये आल्याचा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आरोप केलाय.

या दरम्यान मोठा गोंधळ उडाला. महाप्रबोधन यात्रेनिमित्त सुषमा अंधारे यांच्यासोबत असलेले ठाकरे गटाचे वक्ते तथा युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाल्याची माहिती समोर आलीय. शरद कोळी यांना पोलिसांच्या ताब्यात न देण्याचा शिवसैनिकांचा पवित्रा होता. त्यातूनच त्यांच्यात झटापट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हे ही वाचा :

शाहरुख खानने लॉकडाऊन मध्ये ‘या’ व्यक्तीकडून घेतले फिटनेसचे सल्ले : जाणून घ्या कोण?

मी हा चित्रपट केला कारण…’ ; अभिनेत्री राधिका आपटेची विक्रम वेधा चित्रपटावर प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version