“भाजप-शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार लवकरच पडेल”,ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील नवीन सरकार लवकरच पडेल", पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया.

“भाजप-शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार लवकरच पडेल”,ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवार, 4 जुलै रोजी कोलकाता येथे सुरू झालेल्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह ईस्टच्या पाचव्या आवृत्तीच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नवीन सरकार लवकरच पडेल. अशी प्रतिक्रीया दिली.

ममता बॅनर्जीनी म्हटले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील नवीन सरकार लवकरच पडेल. मला विश्वास आहे की हे सरकार चालू राहणार नाही. हे अनैतिक अलोकशाही सरकार आहे. त्यांनी सरकार जिंकले असते, पण त्यांनी महाराष्ट्राचे मन जिंकले नाही”.

हेही वाचा : 

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

“तुम्ही तुमच्या सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीला नष्ट करू शकता, पण या देशातील जनता लोकशाही मार्गाने तुम्हाला संपवणार, ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना “आसाममध्ये भाजपकडून पैसे आणि इतर गोष्टींचा पुरवठा केला” असा आरोप देखील केला.

महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासुन सत्ता नाट्य रंगल होते. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त झाले असुन राज्यात पुन्हा नवं सरकार आले आहे. विविध राष्ट्रीय नेते महाराष्ट्रातील या सत्तातरावर प्रतिक्रीया देत आहेत.

कतरिना ची हुबेहूब कॉपी

Exit mobile version