spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वादग्रस्त वक्तव्यानंतर मंगलप्रभात लोढा यांचं सप्ष्टीकरण

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांचं छत्रपती शिवरायांवरील (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण ताजं असतानाच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यांच्या या विधानानंतर वाद निर्माण झालाय. अनेकांनी लोढा यांच्या या विधानाना निषेध केलाय. या सगळ्या टीकेनंतर लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी आपल्या विधानाचं स्पष्टीकरण दिल आहे.

मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्टीकरण दिले आहे आणि स्पष्टीकरण देत ते म्हणाले आहेत कि, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली नाही. तर जो प्रसंग घडला याची तुलना केली. केवळ त्या प्रसंगातील साधर्म्य दाखवण्याचा माझा प्रयत्न होता, असं मंगलप्रभात लोढा म्हणालेत.

आज ३६३ वा शिवप्रताप दिन प्रतापगडावर साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित होते. शिंदे व्यासपीठावर मंगलप्रभात लोढा यांनी बंडाची तुलना शिवरायांच्या आग्र्यातील (Agra) सुटकेशी केली. लोढा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब बादशाहने (Emperor Aurangzeb) आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. परंतु शिवरायांनी स्वत:साठी नाही तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले, पण एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी बाहेर पडले.

मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. दुसरीकडे त्याचा वेगळा अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया उदय सामंत (Uday Samantha) यांनी दिली आहे. या वाचाळवीरांना आवरा म्हणत अजित पवार यांनी टोला लगावला आहे. एखाला ठेच लागल्यानंतर दुसरा शहाणा होतो, पण यांच्यामध्ये स्पर्धाच लागल्याचे ते म्हणाले. महाराजांची तुलना कधी होऊ शकते का? अशीही विचारणा त्यांनी केली.

हे ही वाचा : 

भारत विरुद्ध न्यूझीलंड तीन एकदिवसीय सामन्यात पावसाची बॅटिंग, भारतानं १-० नं मालिका गमावली

राक्षसी महत्त्वकांक्षेसाठी महाराष्ट्र मागे पडतोय, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss