spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Devendra Fadnavis तुम्ही केव्हाही निवडणुका घ्या, आम्ही तयार आहोत: Manoj Jarange Patil

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज (रविवार, ८ सप्टेंबर) अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद पार पाडली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यात गुप्त बैठक झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अश्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या भेटीबाबत भाष्य केले. मराठा आरक्षण, मराठा आंदोलन आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून चर्चा झाली असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. यावेळेस पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत मोठे भाष्य करत, “फडणवीस साहेबाना सांगा आम्ही रेडी आहोत,” असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “आम्हला त्यांच्यासारखी तयारी करायची गरज नाही, आमच्याकडे आयत मतदान आहे. यांनी केव्हाहि निवडणुका घेऊ द्या, आमचं लढायचं ठरलं की आम्ही केव्हा ही तयार आहोत. आमचं ठरलंय. त्यांनी सकाळी निवडणुका घ्या, आम्ही तयार आहोत. आम्ही रेडी आहोत फडणवीस साहेबाना सांगा आम्ही रेडी आहोत टाईट आहोत. हा देवेंद्र फडणवीस यांचा ट्रॅप आहे, यांनी सगळे लोक फोडायला लावले. यांनी संघटना फोडल्या, ज्यांना मराठ्यांची गरज नाही तेच आमदार बोलतायत. भाजपातले मराठा काही आमदार जाती विरुद्ध कधीच बोलणार नाही, पण वेळ आली की जे मराठ्या विरुद्ध बोलतायत. त्यांना मराठा समाज वेळ आल्यावर सरळ करतील यांना सोडणार नाही,” असे ते म्हणाले.

मराठा आरक्षणावर भाष्य करत ते पुढे म्हणाले, “ज्याचे प्रमाणपत्र निघाले तो डोळ्यांनी बघतो, आपल्या लेकराचं भविष्य बघतो. मराठा आत्ता त्याच्या लेकराच्या भविष्याच्या बाजूने बोलायला लागलाय, पक्षाच्या बाजूने नाही. त्यामुळे घोगडी बैठकीला येतोय, आम्ही या माध्यमातून चर्चा करतोय, या काही सभा नाही की ग्राउंड भरलं पाहिजे. सगळे मराठे सध्या लेकराच्या बाजूने आहे, नेता ७० वर्षांपासून मोठा झालाय. त्याच्या बाजूजे फक्त आमदार आणि नेते बोलतायत. मराठा नाही, जे पक्षावर आणि नेत्यावर जास्त प्रेम करतात ते मराठांच्या विरुद्ध बोलतात. मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटला की मी इतर सामाजाच्या प्रश्नासाठी लढणार आहे. तेव्हा मी एकटा होतो, आत्ता सर्व सोबत आले, आत्ता त्या समाजाचे किती येतात हे मोजत नाही. माझा हा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न आहे, एकदा लढा उभा केला तर मी तो सोडत नाही, समोरून कुणी असो,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Sharad Pawar यांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर वर्ष कळणार नाही; Sanjay Raut यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Congress, Sharad Pawar गट मुख्यमंत्रीपदासाठी Uddhav Thackeray यांचे नाव कधीही घोषित करणार नाहीत, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचे मोठे विधान

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss