spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole यांनी Maratha Reservation प्रश्नी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा… Manoj Jarange Patil यांचे मोठे वक्तव्य

मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज (शुक्रवार, २६ जुलै) मोठे वाक्यवाय केले असून नेहमी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या जरांगे पाटील यांनी आता महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांना लक्ष्य केले आहे. मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि नाना पटोले (Nana Patole) यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे वक्तव्य त्यांनी यावेळी केली. तसेच, ‘जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकारने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा,’ असे आवाहन त्यांनी महायुती सरकारला केले आहे.

मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले, “आपल्या समाजाला मोठं करायचं असेल तर सर्वानी एकत्र यायला हवं. आम्ही सर्वसामान्य गोरगरीब मराठ्यांसाठी लढणार आहोत. भाजपच्या लोकांचे डोके काम करत नाही. आम्ही त्यांना भाव देत नाही. शेवटी मराठ्यापुढं शांत बसले नाही तर मराठा संपवून टाकेल. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मराठा समाजाला ओबीसींमधून आरेखन दिले पाहिजे कि नाही. जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा. विरोधकांची वाट पाहू नये,” असे ते यावेळी म्हणाले.

मनोज जरांगे पाटील हे आपल्या मूळ गावी मातोरी येथे यात्रेसाठी निघाले आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले, “आज मूळ गाव मातोरी येथे यात्रासाठी निघालोय. आमचं मूळ गाव आहे तिथे दर्शनासाठी जाणार आहे. आधी झालेला राडा आणि माझ्या दौऱ्याचा काहीही संबंध नाही. सरकारशी बोलणं झालेलं नाही. पाऊस सुरु असल्यामुळे ते तिथे व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही त्रास देत नाही. २९ ऑगस्टला सर मराठा समाज कातर येणार आणि त्यावेळी ठरवणार विधानसभा निवडनूक लढवायची का नाही.. मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय नाही,” असे ते यावेळी म्हणाले.

दाखवायचे मराठ्यांसाठी करतोय, आणि कुणाचीतरी तळी उचलायची; प्रवीण दरेकर यांची टीका

भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या निवडणूक लढवण्याचा मुद्ययावरून भाष्य केले. ते म्हणाले, “प्रत्येकाला लोकशाहीत निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. आमचे म्हणणे तेच आहे तुम्ही पडद्यामागून आपल्या राजकीय महत्वकांक्षा पूर्ण करण्याऐवजी ओपन राजकारणात या. राजकारण सगळ्यांसाठी मोकळे आहे. दाखवायचे मराठ्यांसाठी करतोय, मराठा समाजाच्या भावनांवर लोकप्रियता मिळवायची त्यानंतर मराठा समाजाच्या प्रश्नांना शिवायचेही नाही. केवळ राजकीय भुमिका मांडायच्या, कुणाची तरी तळी उचलायची, कुणाला पाडणार त्याचे नियोजन करायचे आणि पूर्णतः कुणाची तरी बाजू घेऊन कुणाचा तरी राजकीय दुस्वास करायचे चालू आहे ते जरांगे यांनी करू नये एवढेच आमचे मागणे आहे,” असे ते म्हणाले.

 

 “लाडका भाऊ आणि बहीण एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष व्यवस्थित चालले असते.” पदाधिकारी मेळाव्यात Raj Thackeray यांनी लागावला टोला

Heavy Rainfal : मुख्यमंत्र्यांनी पूरजन्य परिस्थितीचा घेतला आढावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss