spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मराठ्यांचा कचका कसा असतो, तुला दाखवतो: Manoj Jarange Patil यांचा Pravin Darekar यांना इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज (रविवार, २१ जुलै) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करत, “देवेंद्र फडणवीस स्वत:ला चतुर समजतात,” असा टोलादेखील मारला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर टीका करत, “दरेकर बेईमान झाला, आपल्या जातीसोबत. थोडं थांबा, आम्ही उतरवतो तुमचं भूत… मराठ्यांचा कचका कसा असतो, तुला दाखवतो,” अश्या शब्दात त्यांनी प्रवीण दरेकर यांना इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील शनिवार २० जुलैपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांनी याबाबतची या आधीच घोषणा केली होती. त्यानुसार जालन्याच्या अंतरवली सराटी (Antarwali Sarati) इथे ते उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधूनच सरसकट आरक्षण द्यावे ही त्यांनी मागणी आहे. सरकारने निर्णय घ्यावा यासाठी त्यांनी अल्टिमेटमही दिले होते. सरकाने चर्चा करून त्यांना आश्वासनही दिले होते. पण अजूनही त्यात काही होत नाही या पार्श्वभूमीवर त्यांनी आता उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस स्वत:ला चतुर समजतात. त्यांना वाटतं मी कोणत्याच जातीच्या लोकांना काही मिळून देणार नाही. तुम्हांला स्वप्नात न वाटणाऱ्या घटना घडणार. मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांचा सुपडा साफ करणार. थांबा तुम्ही, फक्त मज्जा बघा,” अश्या शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे.

यावेळी प्रवीण दरेकर यांच्यावर टीका क्लारात ते म्हणाले, “ते भाजपकडे गेले आणि त्यांनी आपले कुटुंब वाचवले. त्यामुळे त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस दिसतो. मराठ्यांच्या जातीची त्यांना काही गरज नाही. त्याच्यावर काही बोलायचं नाही. आम्ही आता आमच्या समाजातील लेकरांच्या बाजूने लढणार आहे. थोडं थांबा, आम्ही उतरवतो तुमचं भूत… मराठ्यांचा कचका कसा असतो, तुला दाखवतो… देवेंद्र फडणवीसांच्या मागे- मागे करतो. दरेकर बेईमान झाला, आपल्या जातीसोबत. फडणवीसांचे उदो- उदो करायला लागला. मीठ मराठ्यांचं खायचं आणि त्यांच्या मागे मागे करायचं. अशी लोकं समाजाला घातक आहेत,” अश्या शब्दांत त्यांनी खरमरीत टीका केली.

हे ही वाचा:

आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठीच चित्रपट, Dharmaveer 2 वरून Sanjay Raut यांची CM Eknath Shinde यांच्यावर टीका

“तुमच्या निवडणुका आणि पाडणं ही प्रायोरिटी आहे का?” Pravin Darekara यांनी जरांगेंना विचारला प्रश्न

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss