Devendra Fadnavis यांनी कितीही गणितं करू द्या, सगळी गणितं मोडून टाकणार; Manoj Jarange Patil यांचा इशारा

Devendra Fadnavis यांनी कितीही गणितं करू द्या, सगळी गणितं मोडून टाकणार; Manoj Jarange Patil यांचा इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आपले उपोषणाचे (Hunger Strike) अस्त्र उपसले आहे. सगेसोयऱ्यांच्या सरसकट अंमलबजावणीसाठी तसेच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवरून मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधत, ‘फडणवीस कितीही गणितं करू द्या सगळे गणितं मोडून टाकणार, फडणवीस हेच सगळ्यांच्या आरक्षणाला अडथळा आहे,” असे भाष्य केले आहे.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सहाव्यांदा आमरण उपोषणाला (Hunger Strike) बसले आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे रात्री १२ वाजल्यापासून जरांगे यांनी त्यांचं आमरण उपोषण सुरू केलं. उपोषणाला बसण्याआधी गावातील महिलांनी जरांगे यांचं औक्षण केलं. त्यानंतर जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे. सगे सोयरे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून अंमलबजावणी करावी. हैदराबाद, सातारा, बॉंबे गॅझेट लागू करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आज (बुधवार, १८ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “सरकारने सगळ्या मागण्या तातडीने मजूर कराव्यात. तिन्हीही गॅझेट दोन-चार दिवसात लागू करणे, ही सरकारची जबाबदरी आहे. मला राजकीय वळणावर जायला भाग पाडू नका. ही फडणवीस यांची जबाबदारी आहे. मला राजकीय भाषा बोलाययची नाही, ज्याची कुणबी नोंद निघाली, त्याला कुणबी प्रमाणपत्र द्या,” असे ते यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “EWS मधून भरलेले विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द केले जात आहे हे योग्य नाही. मराठ्यांचे कल्याण न होण्यासाठी फडणवीस पुर्णपणे दोषी आहेत, गरीब मराठ्यांवर अन्याय करणारे फक्त फडणवीस आहेत. माझ्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मग पाडापाड्या कशा झाल्या याबाबाबत माझ्या नावाने ओरडू नका. मला राजकिय वाटांवर फडणवीस यांनी जाऊ देऊ नये,” अश्या शब्दांत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.

ते पुढे म्हणाले, “किती दिवस प्रक्रिया सुरू आहे म्हणून सांगता? सात महिने प्रक्रिया सुरू असते का? मला मूर्ख समजता काय? दोनचार दिवसांमध्ये आमच्या मागण्यांचे तुकडे पाडा, मी रस्त्यावर आलो तर तुमचा खेळ खल्लास होईल. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुमचं राजकीय करीअर उध्वस्त करेल. भारतात अशी जात नाही की जिने वर्षभर सरकारला सहकार्य केले,आम्ही सहकार्यच केले, आता सरकारला लाज वाटायला हवी, दोनचार दिवसांत सगळया विषययाची अंमलबजावणी करा. फडणवीस कितीही गणितं करू द्या सगळे गणितं मोडून टाकणार, फडणवीस हेच सगळ्यांच्या आरक्षणाला अडथळा आहे,” अश्या शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले आहे.

महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गट दोघेही आश्रित, भाजपचे तुकडे त्यांना स्वीकारावे लागतील: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version