Devendra Fadnavis यांना ही शेवटची संधी, Manoj Jarange Patil यांचा इशारा

Devendra Fadnavis यांना ही शेवटची संधी, Manoj Jarange Patil यांचा इशारा

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सहाव्यांदा आमरण उपोषणाला (Hunger Strike) बसले आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे रात्री १२ वाजल्यापासून जरांगे यांनी त्यांचं आमरण उपोषण सुरू केलं. उपोषणाला बसण्याआधी गावातील महिलांनी जरांगे यांचं औक्षण केलं. त्यानंतर जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे. सगे सोयरे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून अंमलबजावणी करावी. हैदराबाद, सातारा, बॉंबे गॅझेट लागू करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच फडणवीस यांना ही शेवटची संधी आहे त्यामुळे त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पुर्ण कराव्या असा इशाराही जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “सरकारला फक्त त्यांची खुर्ची दिसते आहे. आम्हा गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे हाल अपेष्टा दिसत नाही. त्यांना फक्त पैसा आणि त्यांच्या पदावरच नजर ठेवत हे राजकारण करत आहे, असा घनाघाती निशाणा आज त्यांनी सरकारवर साधला आहे.

यावेळी त्यांनी मागणी केली आहे की, “सग्या सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी सरकारने केली पाहिजे, मराठा आणि कुणबी एकच आहे आणि ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली, मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. तसेच राज्यात मराठा समाज बांधवांवर आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या सर्व केसेस मागे घेण्यात यावे. यांसारख्या मागण्या घेऊन ते पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की आता तुम्हाला हे सर्व मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करत किंवा करण्याची संधी आम्ही दिलेली आहे. नंतर आम्हाला म्हणू नका की आम्ही कोणाला पाडलं आणि कोणाला नाही पाडलं,” असा इशारा यावेळी त्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळेच या लढ्यात स्वातंत्र्य झालेल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी सर्व नागरिकांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.

महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गट दोघेही आश्रित, भाजपचे तुकडे त्यांना स्वीकारावे लागतील: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version