Thursday, July 4, 2024

Latest Posts

Chhagan Bhujbal तलवार काढण्याची धमकी देत असेल तर… Manoj Jarange Patil आक्रमक

राज्यात आरक्षणप्रश्नावरून वातावरण तापलेले असतानाच आज (सोमवार, २४ जून) मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांसह मराठा नेत्यांवरसुद्धा टीका केली.

राज्यात आरक्षणावरून मराठा ओबीसी वादावर जोरदार खडाजंगी चालू आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) ओबीसींमधून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवर ठाम आहेत तर दुसरीकडे इतर ओबीसी नेते यावर विरोध करत असून ओबीसी आरक्षणात (OBC Reservation) इतर वाटेकरी नको सही मागणी करत आहेत. राज्यात आरक्षणप्रश्नावरून वातावरण तापलेले असतानाच आज (सोमवार, २४ जून) मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांसह मराठा नेत्यांवरसुद्धा टीका केली. यावेळी ते म्हणाले, “सगळे ओबीसी नेते मराठ्यांना कायदेशीर आरक्षण मिळू नये, यासाठी मताचा विचार करत नाही. मात्र मराठा नेते मतांचा विचार करत आहे.यामुळे मराठा नेत्यांनी एकत्र आले पाहिजे,” असे आवाहनदेखील त्यांनी केले.

यावेळी ते म्हणाले, “मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्य मागणी कायद्याने केली त्यामुळे यांना पटत नाही. मी मूळ मुद्दा मांडल्याने ओबीसी नेत्यांचे रंग उघडे पडले आहे. यामुळे मराठा नेत्यांना सांगतो, सगळे ओबीसी नेते मराठ्यांना कायदेशीर आरक्षण मिळू नये, यासाठी मताचा विचार करत नाही. मात्र मराठा नेते मतांचा विचार करत आहे. यामुळे मराठा नेत्यांनी एकत्र आले पाहिजे. मराठ्यांना आरक्षण मिळू नये, यासाठी ओबीसी नेते एकत्र आले. मग मराठ्यांच्या नेत्यांना कळत नाही का? मला सगळ्यांनी घेरलं आहे. मी एकटा पडलो आहे. समाजातील नेत्यांनी एकजुटीनं आलं पाहिजे. ६ जुलै पर्यंत सर्वांनी काम आवरून घ्या. शांतता रॅलीत सगळ्यांनी ताकतीनं लढायचं आहे. मी एकटा पडलो तरी मागे हटत नाही. शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली, ते म्हणाले १३ तारखेपर्यंत विश्वास ठेऊन कुणाला बोलू नका. १३ तारखेपर्यंत कुणाला उत्तर देणार नाही. मराठ्यांनी तयार राहा. यांनी दंगल घडवली तर माझा एकही माणूस मरता काम नये.”

राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलन भरकटवत असल्याचा आरोप केला होता.त्यावर जोरदार प्रत्युत्तर देत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “मराठा नाही म्हणत असतील तर नाही. आंदोलन भरकटत म्हणत असतील तर भरकटले. आम्ही कायदेशीर नोंदींच्या आधारे आरक्षण मागत आहोत तर काय चूक? मराठा- कुणबी एक, मी कायद्याला धरून बोलत आहे. तलवारी काढा म्हणता, हे दिसत नाही का? आम्ही जिथे आंदोलन करतो तिथे ठरवून आंदोलन बसवले, यामुळे मराठ्यांच्या बाजूने बोलायला शिका. तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या सोबतचे ओबीसी नेते आमदार इथे येऊन बोलत आहे. समाजाच्या बाजूने या. तुम्ही साथ द्या नाही तर नका देऊ, मी देणार…”

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर टीका करत ते म्हणाले, “मुस्लिम समाजाला खुश करायला मी मुखमंत्री आहे का? पाशा पटेल मला भेटले ते म्हणाले, माझ्यामुळे मी ओबीसी मध्ये आले. मग ते अगोदर कुठे होते ओबीसी मध्ये? आदिवासी समाजात ठाकर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं का? त्यांच्या सुविधा का त्यांना मिळू नये? यांनी ST समाजाला आरक्षण मिळून दिले भुजबळ चिथावणी देत आहे. यामुळे मराठ्यांनी सावध झालं पाहजे. मराठे ५६ टक्के आहेत. भुजबळ तलवार काढण्याची धमकी देत असेल तर जशासं तसे उत्तर देणार आहे. भुजबळ म्हणाले तलवारी गंजल्या, त्या घासून ठेवा याचा अर्थ दंगल घडवायची आहे.”

हे ही वाचा

Manoj Jarange Patil यांच्या मागणीचा हेतू राजकीय? आरक्षण म्हणजे खिरापत नाही, Laxman Hake यांचा हल्लाबोल

मुस्लिमांना देखील OBC मधून आरक्षण द्या, कसं देत नाही ते बघतोच; Manoj Jarange Patil यांचे मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss