spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MANOJ JARANGE-PATIL: २४ डिसेंबरपर्यंत आपली कसोटी आहे, आरक्षणाचा विजय महत्त्वाचा

राज्यात शांतता राहावी म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करताय. तर जरूर गुन्हे दाखल करा. ते गुन्हे आम्ही अंगावर घेऊ. लोकांना आम्ही शांततेचं आवाहन करतोय. हे आमचं चुकतंय का?, असं यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मराठ्यांच्या एकजुटीचा प्रश्न आहे, यात कुणीही मागे राहणार नाही. आपल्याला आरक्षणाचा विजय पाहायचा आहे. मराठ्यांच्या जवळपास ३२ लाख ओबीसी नोंदी सापडल्या आहेत. २४ डिसेंबरपर्यंत आपली कसोटी आहे. असे सांगत ‘या सरकारला दंगली घडवून आणायच्या आहेत’, असा हल्लाबोल मनोज जरांगे-पाटील यांनी ठाण्यातील सभेत केला. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील (MANOJ JARANGE-PATIL) यांची २१ नोव्हेंबर म्हणजेच आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात (THANE) जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन (GADKARI RANGAYATAN) नाट्यगृहात मनोज जरांगे-पाटील यांची सभा पार पडत आहे. त्यावेळी त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

मराठा बांधव एकमेकांना मदत करतात. रात्री-बेरात्री जरी काही अडचण आली तर आपण एकमेकांची मदत करतो. मात्र यांच्या राजकीय स्वार्थासाठी आपण आपल्यात वाद होऊ द्यायचे नाहीयेत. दंगली होऊ द्यायच्या नाहीयेत. हे आम्ही रात्रंदिवस सांगत आहोत. पण ज्या लोकांनी कार्यक्रम घेतले. त्यांच्यावरच तुम्ही गुन्हे दाखल करत आहात. पण जरी तुम्ही गुन्हे दाखल केले तरी आम्ही थांबणार आहोत का? असा सवाल मनोज जरांगे-पाटील यांनी ठाण्यातील सभेत केला. राज्यात शांतता राहावी म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करताय. तर जरूर गुन्हे दाखल करा. ते गुन्हे आम्ही अंगावर घेऊ. लोकांना आम्ही शांततेचं आवाहन करतोय. हे आमचं चुकतंय का?, असं यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सभेसाठी जय्यत तयारी 

ऊठ मराठा जागा हो, आरक्षणाचा धागा हो, ‘आवाज मराठ्यांचा’, साथ जनमानसांची, ‘एक मिशन- मराठा आरक्षण’, ‘एक मराठा-लाख मराठा’ अशा आशयाचे बॅनर ठाण्यात पाहायला मिळाले.  या सभेपूर्वी कल्याणहून ठाणे शहरात दाखल होणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांचा भव्यदिव्य रोड शो झाला. २५ जेसीबीच्या साहाय्याने मनोज जरांगे यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. जागोजागी भगव्या रंगाचे फुगे आणि ‘एक मराठा-लाख मराठा’ असे लिहिलेल्या टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते दिसून आले.

हे ही वाचा:

Samruddhi Mahamarg दोन दिवस राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

Maharashtra: कार्तिकी महापूजेचा मान कोणाला? आज निर्णय होण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss