मी एकटा पडलोय पण मी मागे हटत नाही – Manoj Jarange

नुकतेच मनोज जरांगे यांनी ओबीसी (OBC) मधून आरक्षणाची मागणी केल्याने ओबीसी समाजाने देखील आंदोलन सुरु केले. लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे ओबीसींकडून आंदोलनास बसले होते. आता नुकताच मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला ज्यात त्यांनी मी एकटा पडलो आहे असं वक्तव्य केलं आहे.

मी एकटा पडलोय पण मी मागे हटत नाही – Manoj Jarange

सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेवर आहे. अनेक दिवसांपासून मराठा (Maratha) आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करत आहेत. आता नुकतेच मनोज जरांगे यांनी ओबीसी (OBC) मधून आरक्षणाची मागणी केल्याने ओबीसी समाजाने देखील आंदोलन सुरु केले. लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे ओबीसींकडून आंदोलनास बसले होते. आता नुकताच मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला ज्यात त्यांनी मी एकटा पडलो आहे असं वक्तव्य केलं आहे.

सोमवारी छत्रपती संभाजीनगर (Ch. Sambhajinagar) मध्ये मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांवर चांगलेच ताशेरे ओढले. ‘आरक्षण मिळाल्यावर गोरगरीब मराठ्यांची पोर मोठी होतील, ते मोठे अधिकारी होतील. अशी भीती सगळ्यांनाच वाटते. त्यामुळे मी आरक्षणाच्या बाजूने उभं राहू नये, म्हणून सगळ्यांनी मला घेरलं आहे. एकटा पडलो आहे. सत्ताधारी मराठा नेते माझ्या बाजूने बोलत नाहीत, त्यांनी मला एकटं पाडलं आहे. विरोधी पक्षातील खासदारदेखील माझ्याबाजूने बोलत नाहीत. मराठा समाजाने एकजूट राहावे, ही माझी विनंती आहे.’ असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ‘मराठा समाजाच्या नेत्यांनी फक्त निवडून येण्यापेक्षा जातीचं आरक्षण महत्व्हाच आहे हे लक्षात घ्यावं. ओबीसी समाजाच्या नेत्यांनी ही गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे. ओबीसी नेत्यांसाठी निवडणुकीपेक्षा जातीचं आरक्षण महत्वच आहे, हे त्यांनी दाखवून दिल आहे. या सगळ्या कारणांमुळे मराठा जात संकटात सापडली आहे. मराठा समाजाला आवाहन आहे कि, ६ ते १३ जुलैपर्यंत होणाऱ्या शांतता जनजागृती रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित रहा. आपल्या डोळ्यांदेखत आपल्या लेकराचं वाटोळं होऊन देऊ नका. ६ तारखेपर्यंत मराठ्यांनी आपली सगळी काम उरकून घ्यावीत. जुलैला एकाही मराठ्याने घरात न राहता शांतता जनजागृती रॅलीत उपस्थित राहावे. कोणीही गावाच्या बाहेर किंवा लग्नकार्याला जाऊ नका. प्रत्येक जिल्ह्यातील जनजागृती रॅलीला ताकदीने प्रतिसाद द्या. आपल्याला घेरलं गेलंय. आपली जात संकटात सापडली आहे. मी एकटा पडलोय पण मी मागे हटत नाही. मी मेलो तरी हरकत नाही, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देईल.’ असे जरांगे पाटील यांनी वक्तव्य केले.

हे ही वाचा

Manoj Jarange Patil यांच्या मागणीचा हेतू राजकीय? आरक्षण म्हणजे खिरापत नाही, Laxman Hake यांचा हल्लाबोल

मुस्लिमांना देखील OBC मधून आरक्षण द्या, कसं देत नाही ते बघतोच; Manoj Jarange Patil यांचे मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version