मनोज जरांगेंनी लोकसभा निवडणूक न लढवता विधानसभा लढवावी; बच्चू कडूंचा मनोज जरांगेंना सल्ला

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंतरवली सराटीमध्ये पुकारले आहे.

मनोज जरांगेंनी लोकसभा निवडणूक न लढवता विधानसभा लढवावी; बच्चू कडूंचा मनोज जरांगेंना सल्ला

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंतरवली सराटीमध्ये पुकारले आहे. आज त्यांनी राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यावर आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मनोज जरांगे यांना सल्ला दिला आहे. सरकारला मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. मनोज जरांगेंनी उपोषण करू नये. उपोषण करणं हे पंडित पुजाऱ्यांना शोभत नाही. तसेच मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, असा सल्ला बच्चू कडू यांनी दिला आहे. सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात कोणतीच तांत्रिक अडचण नाही, असे देखील बच्चू कडू म्हणाले.

मराठा आरक्षणाचा मुद्दा लवकरचं मार्गी लागेल. आरक्षण संदर्भात अधिसूचनेविरुद्ध सहा लाख तक्रारी आलेल्या आहेत. पुढील एक महिन्यांत या तक्रारींचे निवारण केले जाईल.अधिसूचना जर लागू झाली तर सगेसोयरे हा विषय देखील लागू होईल. त्यामुळे सरकारने जो मराठा आरक्षणासंदर्भात कायदा केला, त्यापेक्षा देखील अधिक चांगला कायदा पुढे लागू होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मराठा आरक्षणाचा कायदा हा लागू होईल आणि तो न्यायालयात देखील टिकेल. तसेच कोर्टात टिकल्यानंतर मराठा समाजाला वेगळा आरक्षण मिळेल. मला असे वाटते, ओबीसी सोबतच हे आरक्षण अधिक लाभदायक ठरेल आणि या महाराष्ट्रातील वाद देखील मिटेल, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगेना लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला होता. मनोज मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला सल्ला हा त्यांचा देखील वैयक्तिक सल्ला असू शकतो. मी त्यांना सल्ला देणारा कोणी मोठा नाही. पण त्यांनी जर निवडणूक लढवण्याचा विचार केला तर त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवता विधानसभा लढवावी. मनोज जरांगेनी सरकारला दोन-तीन महिने वेळ दिला पाहिजे. आगामी निवडणुकांसाठी लागणारी आचारसंहिता ही एप्रिल महिन्यापर्यंत संपेल. नंतर मे महिन्यात सरकार काय पुढाकार घेतं, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

हे ही वाचा:

असहकार पुकारायच्या आधी म्हटलं आयोगाला एकदा समजावून सांगू – Raj Thackeray

Sridevi Death Anniversary : ​​श्रीदेवीच्या पुण्यतिथीला खुशी कपूर झाली भावूक, फोटो शेअर करत…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version