भाजपाचे अनेकजण काँग्रेसच्या संपर्कात ; नाना पटोले

भाजपाचे अनेकजण काँग्रेसच्या संपर्कात ; नाना पटोले

अनेक दिवसांपासून सुरु दसरामेळवा साठी रस्सीखेच काळ संपली. दादरच्या शिवाजी पार्क नियोजित दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला परवानगी नाकारणारा मुंबई महापालिकेचा निर्णय अयोग्य आणि कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग असल्याची टिप्पणी करीत काल उच्च न्यायालयाने शुक्रवारी तो रद्द केला आणि मेळावा घेण्याची परवानगी ठाकरे यांना दिली. या नंतर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शिवसैनिकांची जल्लोष साजरा केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी न्यायालयाच्या या निणर्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर निशाणा साधला आहे. तसेच, भाजपाचे अनेकजण काँग्रेसच्या संपर्कात असल्याचंही यावेळी पटोले यांनी सांगितलं. अकोला येथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

प्रसारमाध्यमांशी बोलतांना नाना पाटोळे यांनी भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधला. राज्यातील सरकार हे स्वत:च कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहे. विजयादशमीच्या दिवशी शिवाजीपार्कवर शिवसेनेचा अनेक वर्षा पासून दसरा मेळावा होत आहे, जो बाळासाहेब ठाकरेंपासून होतोय. काँग्रेसच्या राजवटीत ते काँग्रेसवर टीका करायचे परंतु तरी जी परंपरा त्यांनी ठरवली, त्या परंपरेला काँग्रेस पाठिंबा दर्शवायचा. सध्या जे नवीन हिंदुहृदयमसम्राट झालेले आहेत तेच हिंदूंच्या व्यवस्थेला विरोधत करताना आपण पाहत आहोत अशी खोचक टीका नाना पाटोळे यांनी राज्य सरकारला लावली.

कायदा आणि सुवेवस्थेबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही पाहीलं असेल की या गटाचा एक आमदार गणेशोत्सवात मुंबईत स्वत: बंदुक चालवत होता. त्यावर गुन्हे दाखल झाले. बंदुकीच्या गोळ्या सापडल्या आहेत. अशापद्धतीने कायदा, सुव्यवस्था बिघडवण्याचा सरकारकडूनच प्रयत्न सुरू असेल, तर ही सगळ्या मोठी घातक व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो असं नाना पाटोळे यांनी केलं.

हे ही वाचा:

‘खोके सरकारचा आवाज जास्त आणि काम कमी’ जनआक्रोश आंदोलनातून आदित्य ठाकरेंचा टोला

‘कौआ हंस की चाल नहीं चल सकता’, आशिष शेलार यांची जोरदार टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version