नाटक संपल्यावरही अनेक लोक सभागृहात थांबलेत, म्हणजे आमची नाटकंही तुम्हाला आवडतात; राज ठाकरे

नाटक संपल्यावरही अनेक लोक सभागृहात थांबलेत, म्हणजे आमची नाटकंही तुम्हाला आवडतात; राज ठाकरे

मागील अनेक दिवसांपासून इतर पक्षातल नेत्यांकडून राज ठाकरे यांच्या भेटीचा सिलसिला सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने राज ठाकरेंची भेट घेत आहेत. आज देखील राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाटकांच्या १२५०० व्या प्रयोगाच्या निमित्ताने एकत्र आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी फडणवीसांसोबत व्यासपीठावर एकत्र आल्याबद्दल मिश्कील टिप्पणी केली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेहमी सोबतच असतात. कोणत्याही कार्यक्रमाला ते दोघे एकत्रच असतात. या कार्यक्रमाला आज मी येणारच नव्हतो. पण प्रशांत यांच्यासाठी आलो. नाहीतर उगाच लोकांना वाटायचं एकावर एक फ्री मिळतात हे, अशी टोलेबाजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यंत्री फडणवीस यांच्यार केली. अभिनेते प्रशांत दामले यांच्या १२ हजार ५०० व्या प्रयोगाचे सादरीकरण आज मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे बोलत होते.

बाहेरच्या देशांमध्ये विमानतळाला देखील कलाकारांची नावं दिली जातात. परंतु, आपल्याकडे फक्त सभागृहांना आणि चौकांना कलाकारांची आवं असतात. आपकल्याकडे कलाकारांची कदर केली जात नाही. ‘आज मोठ्या कलाकारांचे सत्कार करण्यासाठी मोठी लोकंच उरलेली नाहीत म्हणून आम्हाला बोलावलं जातं,अशी खंत राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले की, प्रशांत दामले यांच्यासारखा माणूस युरोपमध्ये जन्माला आला असता तर या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहिले असते. आताच देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला हजेरी लावून गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही येऊन गेले. मागील काही दिवसांत दोन-चार कार्यक्रम सोबत झाले. त्यामुळे मी संभ्रमात होतो की, कार्यक्रमाला यावं की नाही. कारण उगाच लोकांना वाटायचं की, एकवर एक फ्री मिळतायत, अशी मिश्कील टिप्पणी राज यांनी केली. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला होता.

हे ही वाचा :

खेळ सुरु असतांना रोहित शर्माचा फॅन घुसला मैदानात; पुढे काय झालं ते वाचा

गुजरातमध्ये पूर्वीचे सर्व विक्रम मोडायचे आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version