spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात येत आहेत – अरविंद सावंत

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात होणारे मोठे प्रकल्प इतर राज्यात गेले आहेत. सुरुवातीला वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यानंतर टाटा एअरबसचा सी-२९५ लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट (Tata Airbus Project) हा नागपूरमध्ये (Nagpur) होणारा प्रकल्प देखील गुजरातमधील वडोदऱ्याला गेला आहे. अशातच आता आणखी एक नागपूरमध्ये होणारा प्रकल्प हैदराबादला (Hyderabad) गेला आहे. फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ही विमान इंजन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये टाकणार होती. मात्र, हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. जमीन मिळवण्यास दिरंगाई झाल्यामुळं हा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती मिळत आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“गुजरातमध्ये भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात येत आहेत. राज्यात वेदान्तचा प्रकल्प येईल, अस छातीठोकपणे मुख्यमंत्री बोलले होते. मात्र, तसं झालं नाही. एअरबसच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आणि आता जखमीवर मीठ चोळणारी घटना म्हणजे सॅफ्रन कंपनीही हैदबादला जात आहे, त्यामुळे आता राज्य सरकारने महाराष्ट्राला ‘जय महाराष्ट्र’ करत सत्तेतून बाहेर पडावे”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.

“राज्यातील डबल इंजिनच्या सरकारचे एक इंजिन फेल असून ते सध्या उलटा प्रवास करते आहे. एखादी कंपनी राज्याबाहेर जात असेल तर आपण समजू शकतो. मात्र, हे सातत्याने होत आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस हे सरकार चालवण्याच्या लायक नसल्याचे सिद्ध झाले असून त्यांनी राजीनामा द्यावा”, अशी टीकाही अरविंद सावंत यांनी केली. “राज्य सरकारडून रोजगार निर्मिती, महागाई किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अशा महत्त्वाच्या प्रश्वांकडे हे सरकार दुर्लक्ष होते आहे, या गोष्टीचं वाईट वाटतं. ‘उचलली जीभ, लावली टाळ्याला आणि लागली किरकिरायला’ अशी सद्याची परिस्थिती आहे”, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा :

आणखी एक अटीतटीचा सामना; बांगलादेशच्या शेवटच्या चेंडूला झिम्बाब्वेविरुद्ध नो-बॉल…

Saffron Project : नागपूरचा अजून एक प्रकल्प महाराष्ट्र बाहेर; सुप्रिया सुळेंसह आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss