नरेंद्र मोदींच्या हस्ते अनेक प्रकल्पांचे लोकार्पण

नरेंद्र मोदींच्या हस्ते अनेक प्रकल्पांचे लोकार्पण

आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले आहेत. आणि या दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदी हे अनेक प्रकल्पांचे लोकार्पण केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांचे रिमोटचे बटण दाबून उद्घाटन करण्यात आले. तसेच वीस बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचं लोकार्पणही करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. तसेच मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि २० आपला दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानात डिजीटल पध्दतीने भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मेट्रो मार्गाने काही अंतर प्रवासही करणार आहेत. दरम्यान, या दौऱ्यावरून विरोधकांकडून टीकाही करण्यात येत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी पश्चिम उपनगरातल्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेसह सर्व रस्त्यांवर दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घातली आहे. मोदींच्या दौऱ्यासाठी सुरक्षा व्यवस्थेचा एक भाग म्हणून राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) चार तुकड्या, दंगलविरोधी पथक आणि जलद कृती दलाची प्रत्येकी एक तुकडी नेमण्यात आली आहे. पोलिसांनी बीकेसी, अंधेरी, मेघवाडी आणि जोगेश्वरी या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स आणि रिमोट-कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्टसह कोणत्याही उड्डाणांवरदेखील बंदी घातली आहे.

हे ही वाचा:

PM Narendr Modi Mumbai Visit Live, डबल इंजिन सरकारमध्ये आता देशाचा विकास होतो, नरेंद्र मोदी

बी. के.सी मैदानातून एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल

 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version